Amol Khatal : अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपविणाऱ्यांना आधी जाब विचारा : खताळ

नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारत प्रगतीपथावर

0
Amol Khatal : अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपविणाऱ्यांना आधी जाब विचारा : खताळ
Amol Khatal : अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपविणाऱ्यांना आधी जाब विचारा : खताळ

Amol Khatal : संगमनेर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांनी महायुती सरकारवर आरोप करण्यापेक्षा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष (Congress) संपविण्यात धन्यता मानणाऱ्यांना जाब विचारावा, असा पलटवार आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या संगमनेर दौऱ्यावर केला आहे.

नक्की वाचा : व्यावसायिकावर हल्ला करत हवेत गोळीबार; सावेडी उपनगरातील घटना

खरी अराजकता काँग्रेसमध्येच

खरी अराजकता काँग्रेसमध्येच असून पक्षाचे अस्तित्व सर्वत्र संपत चालले आहे. ज्यांना पक्षाने मोठी पदे देऊन मोठे केले, त्यांनीच अहिल्यानगर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष कसा संपवला? याचे आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ यांनी करावे. नाशिक पदवीधर निवडणूक आणि त्यानंतरच्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांकडे जाऊन हर्षवर्धन सपकाळ पाहुणचार घेत आहेत. हा निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे, असा टोला आमदार खताळ यांनी लगावला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारत प्रगतीपथावर (Amol Khatal)

जागतिक स्तरावर संकट आणि अनिश्चिततेचे वातावरण असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारत प्रगतीपथावर असल्याचे खताळ यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.कांद्याच्या बाजारभावासारख्या विषयांवर सरकारसमोर आव्हाने आहेत. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकार तत्परतेने काम करत आहे. तसेच ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या साठेबाजीमुळे कृत्रिम तुटवडा

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध होऊन बाजारपेठेतही चलनवाढ होईल. महायुती सरकार शेतकरी हिताची भूमिका घेणारे सरकार असल्याचे आमदार खताळ यांनी यावेळी स्पष्ट केले. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याबाबत बोलताना आमदार खताळ म्हणाले की, काही ठिकाणी अफवा आणि साठेबाजीमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सरकार सातत्याने काम करत असून विरोधक मात्र अराजकतेचे वातावरण निर्माण करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत.