Yugendra Pawar : २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून कोण लढणार? युगेंद्र पवार काय म्हणाले?

0
Yugendra Pawar : २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून कोण लढणार? युगेंद्र पवार काय म्हणाले?
Yugendra Pawar : २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून कोण लढणार? युगेंद्र पवार काय म्हणाले?

नगर : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत असून पुढील काही दिवसांत विधानपरिषद निवडणुकांसाठी (Legislative Council Election) उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. या निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच, दुसरीकडे पुन्हा एकदा २०२९ ला बारामतीतून विधानसभा कोण लढवणार याची चर्चाही होत आहे. आता, युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनीही २०२९ च्या निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

नक्की वाचा: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? वाचा सविस्तर…

युगेंद्र पवार यांनी बारामती झालेल्या संवाद बैठकीबद्दल माहिती दिली. शरद पवारांनी मुंबईतील वाय.बी.सेंटरला एक मीटिंग बोलवली होती, त्याठिकाणी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला होते. लवकरात लवकर तुम्ही पक्षाच्या सर्व नियुक्त्या करा, अशा सूचना आम्हांला तिथे देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही आमचं काम सुरू केल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. तसेच, २०२९ मध्ये बारामती विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं.

‘मला लोकांना वेळ देता आला’ (Yugendra Pawar)

पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय खात्री आहे? उद्या काहीही होऊ शकते, असे म्हणत युगेंद्र पवार यांनी बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार नसल्याचे सूचवले आहे. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे, २०२९ साठी आणखी तीन वर्षे बाकी आहेत. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात, तुम्ही २०२८ ला मला विचारा मग मी सांगतो, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.  

अवश्य वाचा: भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचे कारण काय?

पक्षात कुठलंही पद न मिळाल्यासंदर्भात विचारणा केली असता, इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांना मोठी मोठी पदे मिळाली आहेत. कदाचित माझी चुकीची अपेक्षा असू शकते. पण, तसं काही झालं नाही आणि ते माझ्या फायद्याचं ठरलं, असे युगेंद्र पवार यांनी म्हटलं. मला लोकांसाठी जास्त वेळ द्यायला मिळाला, मी लोकांमध्ये जाऊ शकलो. काही लोक पद घेतात, पण पदाला न्याय देत नाहीत. मला तसं करायचं नव्हतं. मला पद मिळालं नाही, त्यामुळे बारामतीकरांसाठी वेळ देता आला, असे म्हणत त्यांनी पद न मिळाल्याचं बरंच झालं असेही सूचवलं.

राष्ट्रवादीचे विलीनीकरण आता होणार नाही(Yugendra Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सगळेच जण संभ्रमात होते, पण आता विलीनीकरण होणार नाही. आपली भूमिका आपण क्लियर केली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील क्लियर केलं आहे, आता विलीनीकरण होणार नाही. त्यांचा निरोप, संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी मी बोललो. आता, विलीनीकरण होणारच नाही, असेही युगेंद्र यांनी स्पष्ट केले.