नगर : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या (Pune Shivajinagar Crime) गेट क्रमांक चार बाहेर बुधवारी (ता.२५) दुपारी मंदार किवळे (Mandar Kiwale attack) याच्यावर चार ते पाच जणांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. विशेष बाब म्हणजे हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा कोयत्यानेही वार केले होते. या घटनेनं न्यायालय परिसरच नव्हे तर विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मोठी दहशत पसरली आहे. मंदार किवळे हल्ला प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना अटक (Eight people arrested)केलं आहे. तर यवत पोलिसांनी काल गुरुवारी (ता. २६) आणखी एका आरोपीला दौंड तालुक्यातील कडेठाण येथून अटक केली. मात्र हा हल्ला नेमका का करण्यात आला, या हल्ल्यासाठी सुपारी नेमकी कोणी दिली आणि या हल्ल्याचा कट नेमका कोणी रचला हे सविस्तरपणे पहा…
नक्की वाचा : पुणे हादरले! शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार,कोयत्याने हात कापले
मंदार किवलेची हत्या करण्यासाठी दिली ५० हजारांची सुपारी (Pune Shivajinagar Crime)
भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंदार किवळे यांच्या हत्येची चव्हाण कुटुंबियांच्या नातलगांनी ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अक्षय चव्हाण (वय २०), अमोल चव्हाण (वय ४८), स्वप्नील गवळी (वय २८), ओंकार उर्फ बब्या पवार (वय १८) सूरज मळेकर (वय २२), सत्यम मोरे (वय २५) आणि प्रथमेश येणपुरे (वय १९) यांना अटक करण्यात आली आहे. तर अर्थव सोपान मारणे (वय १९) हा येरवडा कारागृहात असून, त्याच्यासह एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा : सण-उत्सवाच्या आनंदात झाडांना दुःख का?कायदा काय?
चव्हाण प्रकरण काय? याचे हल्ल्याशी काय कनेक्शन? (Pune Shivajinagar Crime)

पोलिस तपासानुसार, २० एप्रिल २०२५ रोजी कात्रजमधील संतोषनगर येथे अर्ध्या गुंठ्याच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून झाला होता. मालमत्तेच्या वादातून लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून शुभम चव्हाण याचा खून करण्यात आल्या प्रकरणी चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली होती. शुभम चव्हाण हा कात्रज भागातील संतोष नगर येथील रहिवासी होता. तसेच त्याचे त्या भागात एक रेस्टॉरंट सुद्धा होते. घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. चव्हाण याचा खुन केल्यानंतर हे सगळे आरोपी पळून गेले होते.
या प्रकरणात मंदार किवळे याचाही सहभाग होता. त्याचाच बदला घेण्याच्या उद्देशाने शुभमचा भाऊ अक्षय चव्हाण याने मंदारचा खून करण्याचे नियोजन केले.आणि या प्रकरणातील आरोपी मंदार केवळे तुरुंगातून बाहेर येताच त्याच्यावर सपासप वार केले. यासाठी मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर आरोपीच्या घरी बैठक घेऊन हल्ल्याची आखणी करण्यात आली. पिस्तूलातून गोळी झाडल्यानंतर कोयत्याने वार करून मंदारला ठार मारण्याचे नियोजन होते. मात्र, हल्ल्यावेळी पिस्तूलातून झाडलेली गोळीचे लक्ष्य चुकल्याने या आरोपींनी मंदारवर कोयत्याने वार केल्याचे तपासात समोर आले आहे.
आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक केली, तर यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. या हल्ल्यात मंदार किवळे मात्र गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता हे प्रकरण अजून काय वळण घेणार तेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



