नगर : राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी काही दिवसांपूर्वी काही खासदारांसह आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने (BJP) त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती (Appointment as Chairman of Petition Committee)करण्यात आली आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले; परिस्थिती काय?
१० सदस्यांची या पॅनेलसाठी नियुक्ती (Raghav Chadha)
समितीचे पुनर्गठन करत सभागृहातील १० सदस्यांची या पॅनेलसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत राघव चड्ढा यांच्यासह हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंककुमार नायक, मस्तान राव यादव बीधा, जेबी माथेर हिशाम, सुभाशीष खुंटिया, रंगव्रा नारझारी आणि संतोश कुमार पी यांचा समावेश आहे.
अवश्य वाचा: मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ
दुसऱ्या एका पत्रकात राज्यसभा सचिवालयाने म्हटले आहे की, राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांनी २० मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्य डॉक्टर मेनता गुरुस्वामी यांची कॉर्पोरेट कायदा (दुरुस्ती) विधेयक २०२६ संदर्भातील संयुक्त समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे
आपची ताकद झाली कमी (Raghav Chadha)
राघव चड्ढा यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेतील आणखी सहा खासदारांसह आम आदमी पक्षाची साथ सोडली होती. या सातही खासदारांनी २७ एप्रिल रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे राज्यसभेत १० खासदार असलेल्या आम आदमी पक्षाकडे आता केवळ ३ खासदार उरले आहेत. यामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे.



