Rahuri Assembly Constituency : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी पूर्ण

Rahuri Assembly Constituency : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी पूर्ण

0
Rahuri Assembly Constituency : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी पूर्ण
Rahuri Assembly Constituency : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी पूर्ण

Rahuri Assembly Constituency : राहुरी : २२३ -‌राहुरी विधानसभा (Rahuri Assembly Constituency) मतदारसंघातील उमेदवारांच्या (Candidates) निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी तहसील कार्यालय (Tehsil Office), राहुरी येथे पुर्ण झाली. या तपासणी प्रक्रियेत एकूण ७ उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून खर्चाची प्रमाणके व तपासणी नोंदवही सादर केली.

नक्की वाचा : वीज वितरणाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा भर उन्हात रास्ता रोको

शंकांचे निरसन करून आवश्यक मार्गदर्शन

खर्च पथकाने सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून ही प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करून आवश्यक मार्गदर्शन केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

खर्च पथकातील सर्व सदस्य उपस्थित (Rahuri Assembly Constituency)

सहायक खर्च निरीक्षक अजय प्रकाश, नोडल अधिकारी (खर्च) शैलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी प्रक्रिया सुरळीत पूर्ण झाली. ​याप्रसंगी लेखाधिकारी माणिक नागरे, सहायक लेखाधिकारी संजय आगलावे, पथक प्रमुख (खर्च) आनंद साठे, प्रवीण मुनोत यांच्यासह खर्च पथकातील सर्व सदस्य उपस्थित होते.