Raid on a Gambling Den : संगमनेर तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड; ८ जण ताब्यात, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Raid on a Gambling Den : संगमनेर तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड; ८ जण ताब्यात, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

0

Raid on a Gambling Den : संगमनेर : तालुक्यातील तळेगाव दिघे येथे स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा (Raid on a Gambling Den) टाकला आहे. या कारवाईत तब्बल ८ जणांना ताब्यात (8 Detained During Operation) घेण्यात आले असून सुमारे ५ लाख ५८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे तळेगाव दिघे शिवारातील रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. या कारवाईत रोख रक्कम ७५ हजार १०० रुपये, ८ मोबाईल फोन, २ मोटारसायकली तसेच इतर साहित्य असा एकूण ५ लाख ५८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांना घेतले ताब्यात (Raid on a Gambling Den)

पंडितनाथ काशिनाथ भेंडे (वय ३५), निसार शफीक, विलास रघुनाथ दिघे (वय ४८), काशिनाथ जननाथ जगताप (वय ४२), सचिन बबन दिघे (वय ४३), गोपाळभाऊ जनाजी जगताप (वय ५०), सुरेश भाऊसाहेब कोंकरे (वय ४९) आणि सुनील नवनाथ दिघे (वय ४२) यांना ताब्यात घेतले असून  आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संगमनेर तालुक्यात दोन मोठे मटका व्यावसायिक आहेत, त्यांचे जाळे तालुकाभर पसरले आहे मात्र स्थानिक गुन्हे शाखा किंवा स्थानिक पोलीस त्या दोघांना वाचवत असल्याचं बोललं जातंय. महत्वाचे म्हणजे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून मुख्य सूत्रधारांवर कारवाई होण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.