Railway : शिर्डीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी; आजपासून धावणार नवी रेल्वे, वेळापत्रक जाहीर

0
Railway : शिर्डीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी; आजपासून धावणार नवी रेल्वे, वेळापत्रक जाहीर
Railway : शिर्डीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी; आजपासून धावणार नवी रेल्वे, वेळापत्रक जाहीर

Railway : नगर : पुणे आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते १७ जून रोजी उद्घाटन झालेली पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस’ आता २२ जूनपासून नियमितपणे रुळावर धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीचे नवीन आणि अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.

हेही वाचा : व्यावसायिकाला मारहाण करून २.४७ लाखांची रोकड लुटली; चौघांवर गुन्हा दाखल

रेल्वे प्रशासनाने घेतला त्वरित निर्णय

१७ जून रोजी मोठ्या उत्साहात या गाडीचे उद्घाटन झाले खरे, मात्र पुढील दोन दिवस ही रेल्वे स्थानकावर न आल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला होता. या गोंधळाची आणि प्रवाशांच्या गैरसोयीची रेल्वे प्रशासनाने त्वरित दखल घेतली. सर्व तांत्रिक अडचणी दूर करून, ही थेट रेल्वे सेवा आता आजपासून (ता. २२) नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नक्की पहा : कोणत्या स्वभाव गुणाचे पुरुष असतात ‘बेस्ट लाईफ पार्टनर’?

जाणून घ्या नवीन वेळापत्रक… (Railway)

ही गाडी पुणे जंक्शनवरून दररोज सकाळी ०६:५५ वाजता सुटून दुपारी १२:०० वाजता शिर्डीला पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात शिर्डीहून सायंकाळी ०६:१० वाजता सुटून रात्री ११:५५ वाजता पुण्याला पोहोचेल. दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर येथे थांबे असलेली ही १५ डब्यांची गाडी भाविक, नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीची ठरणार असून यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.