Oath : नगर : वडिलांसारखीच पांढरी टोपी आणि तोच करारी बाणा बाळगत जेव्हा अक्षय कर्डिले आमदारकीची शपथ घेण्यासाठी पुढे आले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेचे डोळे त्यांच्यावर खिळले. राहुरी-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी महाराष्ट्र विधानसभेत शपथ घेतली.
हेही वाचा : व्यावसायिकाला मारहाण करून २.४७ लाखांची रोकड लुटली; चौघांवर गुन्हा दाखल
पारंपरिक पांढरी टोपी
व्यासपीठावर जाताना अक्षय कर्डिले यांनी आपले वडील दिवंगत आमदार व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या संस्कारांची आणि त्यांच्या खास शैलीची आठवण करून देणारी पारंपरिक पांढरी टोपी परिधान केली होती.
नक्की पहा : कोणत्या स्वभाव गुणाचे पुरुष असतात ‘बेस्ट लाईफ पार्टनर’?
मराठीतून शपथ (Oath)
शपथ घेताना वडिलांच्या आठवणीने ते काही काळ भावुक झाले होते. भारतीय संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगत, देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता उन्नत राखण्याची शपथ त्यांनी मराठीतून घेतली. ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर लागलेल्या या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले १ लाख १२ हजारांहून अधिक विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते.



