Rajasthan Royals Jersey:राजस्थान रॉयल्स आयपीएल साठी सज्ज;नवी जर्सी रिलीज 

राजस्थान रॉयल्सनं आपली नवी कोरी जर्सी लाँच केली आहे. ही जर्सी मागील वर्षीच्या कलर्समध्येच असली तरी त्यात काही खास गोष्टी आहेत.

0
Rajasthan Royals Jersey
Rajasthan Royals Jersey

नगर : आयपीएलच्या १७ व्या हंगामाला अवघ्या तीन आठवड्याचा कालावधी बाकी आहे. येत्या २२ मार्चपासून आयपीएलच्या (IPL 2024) रनसंग्रामाला सुरुवात होईल. त्यासाठी सर्व संघाने कसून तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आपली नवी कोरी जर्सी लाँच केली आहे. ही जर्सी मागील वर्षीच्या कलर्समध्येच असली तरी त्यात काही खास गोष्टी आहेत. सोशल मीडियावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

नक्की वाचा : शेतकरी आंदोलन आक्रमक! देशभरात ‘या’ दिवशी रेल रोको आंदोलन

संघाची जर्सी कोणत्याही डिझायनरने डिझाइन केलेली नसून संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने तयार केली,असे राजस्थान संघाने सांगितले. राजस्थान रॉयल्सनं तसा व्हिडीओ पोस्ट केला. मात्र त्या व्हिडीओच्या शेवटी त्यात एक ट्विस्ट आहे. जर्सी चहलने डिझाइन केलेली नाही, असे व्हिडीओत सांगण्यात आले.

मागील हंगामात राजस्थानची खराब कामगिरी (Rajasthan Royals Jersey)

आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी खराब झाली होती. राजस्थानचा संघ क्वालिफाय करु शकला नाही. या संघाला १४ सामन्यांपैकी सात सामन्यात विजय मिळवता आला. गुणतालिकेत हा संघ पाचव्या क्रमांकावर राहिला होता.

अवश्य वाचा : आमिर खानच्या मुलाचे सिनेसृष्टीत पदार्पण;’महाराज’चा फर्स्ट लूक टीझर लॉन्च  

राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू  (Rajasthan Royals Jersey)

अॅडम झम्पा, आवेश खान (ट्रेड), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायस्वाल, युजवेंद्र चहल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here