Sakur-Tekadwadi Bridge : संगमनेर : तालुक्यातील साकूर व पारनेर तालुक्यातील टेकडवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्यावरील पुलाचे (Sakur-Tekadwadi Bridge) संरक्षण कठडे तुटल्याने हा पुल अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलाचे लोखंडी संरक्षण कठडे तुटल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) तातडीने येत्या आठ दिवसात संरक्षण कठडे बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे (Bhumiputra Farmers’ Organization) संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिला आहे.
नक्की वाचा : पारनेर शहरातील महामार्गाच्या कामाला गती द्या; पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
संरक्षणात्मकदृष्ट्या पूर्वकाळजी घेणे गरजे
मात्र, अद्याप पाटबंधारे विभागाने पुलाला संरक्षण कठडे बसविले नाही. सद्यस्थितीत कठड्याअभावी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबधीत विभागाने दुर्घटनेची प्रतिक्षा न करता तात्काळ या पुलाच्या संरक्षण कठड्याची तातडीने दुरुस्ती करून नवीन लोखंडी कठडे बसवावेत अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी केली आहे. तसेच येत्या आठ दिवसांत पाटबंधारे विभागाने संरक्षण कठडे बसविले नाही तर भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने थेट आंदोलन करण्याचा इशारा संतोष वाडेकर यांनी दिला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अपघात होण्याची दाट शक्यता (Sakur-Tekadwadi Bridge)
संगमनेर व पारनेर तालुक्याच्या सीमेवरून मुळा नदी वाहते त्यामुळे साकुरहन पारनेर तालुक्यातील टेकडवाडीकडे येण्या-जाण्यासाठी या नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यावर असणाऱ्या पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे अनेक दिवसांपासून तुटले आहे. धोकादायक बनलेल्या या पुलावरून अनेक मोटार सायकलस्वार, शाळकरी विद्यार्थी, नागरीक सातत्याने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. पुलाचे कठडे तुटल्यामुळे येथे कधीही अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबधीत विभागाने संरक्षणात्मकदृष्ट्या पूर्वकाळजी घेणे गरजेचे आहे.



