Sam Bahadur : ‘जिंदगी उनकी, इतिहास हमारा’; सॅम बहादुर चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित

New poster of Sam Bahadur movie released

0
249

नगर : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा लवकरच सॅम बहादुर या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सॅम बहादुर हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतेच विकीनं सॅम बहादुर या चित्रपटाचे एक नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

विकीनं शेअर केलेल्या सॅम बहादुर चित्रपटाच्या पोस्टरवर  “जिंदगी उनकी, इतिहास हमारा” असं लिहिलेलं दिसत आहे. त्याने या पोस्टरला कॅप्शन दिलं, “To a life well lived”.  सॅम बहादुर चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार  यांनी देखील सॅम बहादुर चित्रपटाचे हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं.

‘सॅम बहादुर’ याचित्रपटामध्ये विकीसोबत फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या अभिनेत्री देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. १९७१ मध्ये पाकिस्तान सोबतच्या युद्धात सॅम माणेकशॉ यांनी अवघ्या १३ दिवसांत शत्रूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले. सान्या मल्होत्रा ही या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू मंकशॉची भूमिका साकारणार आहे. तर फातिमा सना शेख या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. १ डिसेंबर २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here