Sambhaji Bhide:मोठी बातमी!संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

0
Sambhaji Bhide:मोठी बातमी!संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला
Sambhaji Bhide:मोठी बातमी!संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

नगर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी (Sambhjai Bhide) यांच्यावर कुत्र्याने हल्ला (Dog Attack) केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,सोमवारी (ता.१४) रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री ११ वाजता ते हा कार्यक्रम संपवून घराबाहेर पडले. त्यावेळी माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.यानंतर त्यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

नक्की वाचा : ‘सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा’ -नरेंद्र मोदी  
संभाजी भिडे यांचं वय सध्या ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात. १९८० च्या आसपास भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती. सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात या संघटनेचे काम चालते. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांची  दुर्गामाता दौड आणि गड-किल्ल्यांवरील उपक्रम चर्चेत असतात.

अवश्य वाचा : विदर्भात तीन दिवस पाऊस बरसणार;हवामान विभागाचा अंदाज 

संभाजी भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याला पकडण्यासाठी मोहीम (Sambhaji Bhide)

सांगलीमध्ये माळी गल्लीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर रात्री कुत्र्याने हल्ला केला होता.ज्या माळी गल्लीत कुत्र्याकडून भिडे गुरुजींवर हल्ला झाला,त्या गल्लीत महापालिकेकडून कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांगली महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाला चावा घेतला. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here