Sandalwood Theft : नगर : अहिल्यानगर वन विभागाच्या (Ahilyanagar Forest Department) जिल्हा कार्यालयातील चंदनाच्या झाडांची चोरी (Sandalwood Theft) केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेत वन कर्मचाऱ्याला बांधून चोरी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
नक्की वाचा: वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर गुन्हे दाखल
या दोघांना घेतले ताब्यात
मसीद नसीब गोलवाल (वय २४, रा. जंजाळा, ता. सिल्लोड) आणि शाहीदखा अलीखा कलेसे (वय २६) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी हा गुन्हा असलमखा भुरेखा पठाण (रा. माहुली, आडगांव, सरक), आणि नसीबखा मुनीरखा जोनवाल (फरार) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
२० हजारांची दोन चंदनाच्या झाडांची चाेरी (Sandalwood Theft)
१८ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर येथील वन विभागीय कार्यालयात रात्रपाळीवर असलेले वनमजूर रमेश पोपट शेळके (वय ५८, रा. गुंडेगांव) यांना चार अज्ञात आरोपींनी अशोकाच्या झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर सहाय्यक वन संरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील सुमारे २० हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेण्यात आली.
याप्रकरणी रमेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार सुनील पवार, फुरकान शेख, शाहिद शेख, गणेश धोत्रे, बाळासाहेब नागरगोजे, अमृत आढाव, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ, योगेश कर्डिले, भगवान धुळे, अरुण मोरे तसेच महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करण्यात आले.
पथकाने घटनास्थळी पाहणी करून आरोपींच्या हालचालींचा अभ्यास केला तसेच यापूर्वीच्या अशा प्रकारच्या चोरीतील आरोपींची माहिती गोळा केली. तांत्रिक व व्यावसायिक तपासाच्या आधारे मसीद गोलवाल (रा. छत्रपती संभाजीनगर) याच्यावर संशय निश्चित झाला.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अजिंठा, सिल्लोड, बदनापुर, आडगांव माऊली, खामगांव, पळसे या भागात सलग पाच दिवस शोधमोहीम राबवण्यात आली. मसीद नसीब गोलवाल (वय २४, रा. जंजाळा, ता. सिल्लोड) आणि शाहीदखा अलीखा कलेसे (वय २६) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी हा गुन्हा असलमखा भुरेखा पठाण (रा. माहुली, आडगांव, सरक), आणि नसीबखा मुनीरखा जोनवाल (फरार) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच या टोळीने औरंगाबाद खंडपीठाच्या परिसरातूनही चंदन चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईत आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे.



