Sanjivani Engineering College | संजीवनीच्या यश नन्नावरेची तैवानमध्ये इंटर्नशीपसाठी निवड; संपूर्ण खर्च तैवानमधील विद्यापीठ उचलणार

0

Sanjivani Engineering College | कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा ( Sanjivani Engineering College ) विद्यार्थी यश संजय नन्नावरे याची तैवानमधील दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. तो रवानाही झाला आहे. या कालावधीत तो डॉ. सिन-लियांग ओऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॉर मेडिकल डिव्हाईस’ या विषयावर संशोधन  कार्य करणार आहे. ही इंटर्नशिप पूर्णतः प्रायोजित असून, यशच्या प्रवास, निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च दायेह विद्यापीठच करणार आहे. तैवानला इंटर्नशिपला जाणारा यश  हा ७६ वा विद्यार्थी ठरला आहे.

हे वाचा – अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक; एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे

नितीन कोल्हे यांच्याकडून त्याचे व पालकांचे अभिनंदन ( Sanjivani Engineering College )

यशला मिळालेल्या संधीबध्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी त्याचे व पालकांचे अभिनंदन केले. तर संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते यश आणि वडील संजय नन्नावरे, आई उज्वला नन्नावरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स  डॉ. महेंद्र गवळी, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दोन ते सहा महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी ( Sanjivani Engineering College )

संजीवनीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागामार्फत विध्यार्थ्यांना  परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिप आणि संशोधनाच्या संधी मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. यापूर्वीही विध्यार्थ्यांना  रशिया, तैवान, कॅनडा, फिलिपाइन्स, ट्युनिशिया, युनायटेड किंगडम इत्यादी ठिकाणच्या नामांकित विद्यापीठांमध्ये दोन ते सहा महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी मिळाली आहे.

ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी  उच्च शिक्षण घेऊन जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञानाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते. त्यांचे हेच दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक विचार आणि कार्याचा वारसा आज नितीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीमध्ये समर्थपणे पुढे नेला जात आहे. 

यशच्या निवडीबद्दल त्याचे वडील संजय नन्नावरे यांनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, यशला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे. संजीवनीतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेने दिलेल्या संधीमुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होतंय. त्याचं हे यश पाहताना पालक म्हणून मनापासून समाधान वाटते.

यावेळी यशने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, माझ्या या यशात आई-वडिलांचे कष्ट आणि संजीवनीतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून मिळालेला अनुभव पुढील शिक्षणात आणि करिअरमध्ये उपयोगात आणण्याचा माझा प्रयत्न राहील.
फोटो ओळीः संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी यष नन्नावरे याची तैवानमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाल्याबध्दल त्यांच्या पालकांसह सत्कार केला. यावेळी डाॅ. कापगते, डाॅ. जावळे व डाॅ. गवळी उपस्थित होते.

संजीवनीच्या विध्यार्थ्यांना  परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपच्या संधी मिळणे ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षणपद्धतीची पावती आहे. परदेशातील इंटर्नशिपमुळे विध्यार्थ्यांना  जागतिक स्तरावरील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत कार्यपद्धती आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. विविध देशांतील विद्यार्थ्यांसोबत  काम केल्याने त्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि जागतिक दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. 

संजीवनीमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून, भविष्यातही जगातील नामांकित विद्यापीठांशी सहकार्य वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.
– अमित कोल्हे (प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here