Savitribai Phule Pune University : उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ किताबावर आव्हाड महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या वर्षी वर्चस्व

खेळाडू घडविण्यासोबतच स्पर्धांचे यशस्वी आयोजन ही महाविद्यालयाची खासियत

0
Savitribai Phule Pune University : उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ किताबावर आव्हाड महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या वर्षी वर्चस्व
Savitribai Phule Pune University : उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ किताबावर आव्हाड महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या वर्षी वर्चस्व

Savitribai Phule Pune University : पाथर्डी : क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरी, शिस्तबद्ध नियोजन आणि खेळाडूंच्या उल्लेखनीय यशाच्या जोरावर पाथर्डी येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने (Babuji Avhad College) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अहिल्यानगर विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार (‘Outstanding Sports College’ Award) महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी हा मान मिळवून महाविद्यालयाने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपली ठसठशीत छाप उमटवली आहे.

नक्की वाचा : दुहेरी रस्त्यांच्या मागण्यांना आळा घालण्यासाठी शासनाची कठोर भूमिका

सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान

मिरजगाव येथील नूतन महाविद्यालयात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख, प्रा. डॉ. अरुण राख, प्रा. डॉ. अशोक डोळस, प्रा. डॉ. अजयकुमार पालवे व प्रा. डॉ. आनंद घोंगडे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी या यशाचे श्रेय खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाच्या पाठबळाला दिले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महाविद्यालयाच्या यशात भर (Savitribai Phule Pune University)

महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षात आंतर महाविद्यालयीन, आंतर विभागीय तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंग (मुले व मुली) संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर आर्चरी (मुली) संघाने विजेतेपद मिळवले. मुलांच्या क्रॉसकंट्री संघाने सांघिक उपविजेतेपद मिळवत महाविद्यालयाच्या यशात भर घातली.महाविद्यालयातील सात खेळाडूंनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले असून, तब्बल ३० खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे.

स्पर्धांचे यशस्वी आयोजन ही महाविद्यालयाची खासियत

खेळाडू घडविण्यासोबतच स्पर्धांचे यशस्वी आयोजन ही महाविद्यालयाची खासियत ठरली आहे. यंदा वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग व शरीरसौष्ठव या स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. तसेच ‘अहिल्यानगर जिल्हा अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स वेटलिफ्टिंग लीग’ आणि ‘जिल्हा युथ, ज्युनियर व सिनियर वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा’ही यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. यापूर्वीही महाविद्यालयाला ‘उत्कृष्ट स्पर्धा आयोजन’ पुरस्कार मिळाला असून, येथील खेळाडूंनी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ तसेच जिल्हास्तरीय ‘गुणवंत खेळाडू’ व ‘गुणवंत मार्गदर्शक’ पुरस्कार पटकावले आहेत.

यांची उपस्थिती

महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके, माजी संचालक डॉ. दिपक माने, जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. तानाजी जाधव व सचिव डॉ. राजेंद्र देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.