School Bus Accident : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक जखमी

0
School Bus Accident : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक जखमी
School Bus Accident : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक जखमी

School Bus Accident : नगर : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत. यातच मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळला. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा

परिसरात एकच खळबळ

या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले उपस्थित होते. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर अनेक शाळकरी मुले गंभीररीत्या जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नक्की पहा : मंत्री भुसे यांचे वाहन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवले

बचावकार्य सुरू (School Bus Accident)

बसवर कोसळलेले झाड अत्यंत वजनी आणि मोठे असल्यामुळे ते बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने जेसीबी (JCB) मशीन पाचारण करण्यात आलं. जेसीबी आणि अत्याधुनिक कटर्सच्या सहाय्याने बसवर कोसळलेला झाडाचा मोठा भाग कापून बाजूला करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर करण्यात आलं.