Financial assistance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा

0
Financial assistance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा
Financial assistance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा

Financial assistance : नगर : शेती व्यवसाय करताना अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तातडीचा आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अहिल्यानगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये, तर अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. एप्रिल २०२३ पासून विमा कंपन्यांऐवजी थेट शासकीय अनुदानाच्या स्वरूपात ही योजना लागू करण्यात आल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकरी कुटुंबांना जलद गतीने आर्थिक मदत मिळाली आहे.

हेही वाचा : संगमनेर उपविभागातील आठ गुन्हेगार तडीपार; संगमनेर प्रांताधिकाऱ्यांचे आदेश 

‘या’ कारणांसाठी मिळते मदत

राज्यातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील सर्व खातेदार शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेले पती, पत्नी, आई, वडील, मुलगा किंवा अविवाहित मुलगी यांपैकी कोणत्याही एका व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळतो. शेती करताना वीज पडणे, सर्पदंश, पूर, रस्ता अथवा रेल्वे अपघात, जनावरांचा हल्ला, उंचावरून पडणे, विषबाधा, विजेचा शॉक, पाण्यात बुडून मृत्यू, विंचूदंश, खून, नक्षलवाद्यांकडून हत्या, दंगल, बाळंतपणातील मृत्यू तसेच अन्य अपघातांचा या योजनेत समावेश आहे. अपघाती मृत्यू तसेच दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा एक डोळा व एक हात अथवा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास दोन लाख रुपये, तर एक डोळा, एक हात किंवा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते.

नक्की पहा : मंत्री भुसे यांचे वाहन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवले

एवढे अनुदान वितरित (Financial assistance)

अहिल्यानगर, श्रीरामपूर, कर्जत आणि संगमनेर या उपविभागांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जुन्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १८३ लाभार्थ्यांना ३ कोटी ६४ लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात २५२ लाभार्थ्यांना ५ कोटी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नवीन योजना लागू झाल्यानंतर सन २०२३-२४ मध्ये २४५ प्रस्तावांसाठी ४ कोटी ८२ लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ४४९ प्रस्तावांसाठी ८ कोटी ७६ लाख रुपये आणि सन २०२५-२६ मध्ये ३५० प्रस्तावांसाठी ६ कोटी ९४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे.