Shani Shingnapur Temple employees call for a strike : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांची संपाची हाक; आयुक्तांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

Shani Shingnapur Temple employees call for a strike : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांची संपाची हाक; आयुक्तांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

0
Shani Shingnapur Temple employees call for a strike : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांची संपाची हाक; आयुक्तांचा कायदेशीर कारवाईचा इशारा
Shani Shingnapur Temple employees call for a strike : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांची संपाची हाक; आयुक्तांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

Shani Shingnapur Temple employees call for a strike : नगर : विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाची हाक देणाऱ्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचारी (Shani Shingnapur Temple employees call for a strike) युनियन आणि प्रशासनाची बैठक आज (ता.८) पार पडली. कर्मचारी युनियनने प्रलंबित मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली असताना, नाशिक विभागाचे आयुक्त प्रवीन गेडाम (Nashik Divisional Commissioner Pravin Gedam) यांनी देवस्थानच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून मागण्यांवर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच प्रस्तावित संप कायद्याच्या चौकटीत येत नसल्यास कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई (Legal action) केली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

आयुक्तांसमोर मांडल्या विविध मागण्या

कर्मचारी युनियनच्या वतीने २०२५ चा दिवाळी बोनस देण्यात यावा, सहावा वेतन आयोग लागू करावा, कर्मचाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्सची सुविधा द्यावी, पूर्वी देण्यात येणाऱ्या ५४ सुट्ट्या पुन्हा लागू कराव्यात, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १ जुलैपासून वार्षिक वेतनवाढ द्यावी, अशा विविध मागण्या आयुक्त गोडम यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गेडाम यांनी सांगितले की, (Shani Shingnapur Temple employees call for a strike)

यावेळी गोडम यांनी देवस्थानच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना सांगितले की, धर्मदाय संस्था किंवा देवस्थानच्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत आस्थापनेवरील खर्चाबाबत कायद्यात मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचे वार्षिक उत्पन्न सुमारे ४० ते ५० कोटी रुपये असून, सध्या त्यापैकी तब्बल ३० ते ३५ टक्के खर्च आस्थापनेवर होत आहे. त्यामुळे देवस्थानकडून नियमापेक्षा अधिक खर्च केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.


दरम्यान, भाविकांकडून दर्शन व प्रसादालयासाठी शुल्क आकारले जाते. त्यामुळे देवस्थान चॅरिटेबल संस्था कशी राहते, असा युक्तिवाद कर्मचारी युनियनच्या वतीने उपस्थित करण्यात आला. त्यावर संबंधित नियम आणि धर्मदाय आयुक्तांकडील नोंदणी तसेच देवस्थानची स्वतंत्र नियमावली यानुसार कार्यवाही होत असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या हेल्थ इन्शुरन्सची मागणी रास्त असून, त्याबाबत प्रशासन सकारात्मक विचार करेल, असेही नाशिक विभागाचे आयुक्त प्रवीन गोडम यांनी सांगितले. त्यामुळे युनियनने संपाचा निर्णय मागे घेऊन चर्चेतून प्रश्न सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले.

देवस्थानची सेवा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने त्यामुळे प्रस्तावित संप बेकायदेशीर ठरू शकतो. संप पुकारण्यासाठी ६० दिवसांपूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, कर्मचाऱ्यांनी केवळ १४ दिवसांची नोटीस दिली, त्यामुळे हा संप बेकायदेशीर ठरू शकतो. सध्या देवस्थानमध्ये सुमारे साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत असून, प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता नसून सुमारे साडेतीनशे कर्मचाऱ्यांत कामकाज चालू शकते, असेही त्यांनी सांगितले. संपाबाबत युनियनने पुढाकार घेतल्यास तो बेकायदेशीर मानून संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे, नेवासा प्रांताधिकारी सुधीर पाटील आणि पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.


यावेळी, शनिशिंगणापूर देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी अतुल चोरमारे, नेवासा प्रांत सुधीर पाटील, लक्ष्मण वाघ, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस यावेळी निरीक्षक दीपक धनवटे, शनीशिंगणापूर देवस्थान युनियन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर शिंदे, कर्मचारी अजित शेटे, राजेंद्र शेटे, हर्षल सोनवणे, संभा बोरुडे आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.