Shiv Sainik : नगर : शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून इतर खासदारांसोबत तेही शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटात जाण्याच्या तयारी आहेत. यावरून आता शिर्डीमध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक (Shiv Sainik) संतापले आहेत. शिर्डीत या मग शिवसेना स्टाईल’ने उत्तर देऊ, असा इशाराही देण्यात आला आहे.
नाक्की वाचा : रामदास आठवलेंना पाडले, आता लोखंडेंचा गेम? भाऊसाहेब वाकचौरे नेहमीच चर्चेत
३ मिनिटांत तब्बल ४ वेळा घेतली साईबाबांची शपथ
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कोते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेब वाकचौरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर झालेल्या बैठकीत वाकचौरेंनी ऑनलाईन मोबाईलवर उद्धव ठाकरेंसोबत बोलताना ३ मिनिटांत तब्बल ४ वेळा साईबाबांची शपथ घेतली होती. ‘मी तुमच्यासोबतच राहीन’ अशी ग्वाही देणाऱ्या या माणसाने दुसऱ्याच दिवशी गद्दारी केली. अशा कपटी आणि गद्दार माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देणार, शिर्डीत येण्याचे थेट आव्हान (Shiv Sainik)
या पक्षबदलानंतर संतप्त शिवसैनिकांनी काळे कपडे परिधान करून वाकचौरेंचा तीव्र निषेध केला. “जर त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात फिरून दाखवावे,” असे थेट आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे. वाकचौरेंनी मतदारसंघात पाऊल ठेवल्यास त्यांना ‘शिवसेना स्टाईल’ने चोख उत्तर दिले जाईल आणि जनता तसेच शिवसैनिक त्यांची जागा दाखवून देतील, असा सज्जड दमही कार्यकर्त्यांनी दिला आहे.



