Theft : पाथर्डी : तालुक्यातील सुसरे (Susare) गावात पहाटेच्या सुमारास धाडसी घरफोडीची घटना घडली. अज्ञात हत्यारबंद चोरट्याने २ लाख ७१ हजार रुपयांची रोकड लंपास (Theft) केली. याप्रकरणी महेश एकनाथ उदागे (वय ३४, सब-ठेकेदार) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) फिर्याद दाखल केली आहे.
नक्की वाचा : माणिकदौंडी येथे समाधान शिबिराचे आयोजन
कपाटातले सामान अस्ताव्यस्त
मिळालेल्या माहितीनुसार, उदागे कुटुंब सुसरे येथील राहत्या घरी गुरुवारी (ता.१६) रात्री झोपले होते. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कपाटाचा आवाज आल्याने महेश उदागे जागे झाले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता कपाट उघडे असून सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले २ लाख ५५ हजार रुपये तसेच दुसऱ्या खोलीतील पँटच्या खिशात ठेवलेले १६ हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चोरट्याला घाबरवण्याचा प्रयत्न (Theft)
त्यानंतर घरातील जिन्याचा दरवाजा उघडा असल्याचे आढळून आल्याने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केल्याची खात्री झाली. दरम्यान, उदागे यांनी प्रसंगावधान राखत माझी बंदूक कुठ आहे पाहतोच याला असा आवाज देत चोरट्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्यारबंद चोरट्याने तत्काळ पळ काढला. उदागे यांनी चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, चोरट्याच्या हातातील हत्यारामुळे त्यांनी पुढे जाणे टाळले. चोरटा अंधाराचा फायदा घेत शेतात पळून गेला. घटनेनंतर ग्रामस्थांनी शोध घेतला, मात्र, तो पसार होण्यात यशस्वी ठरला.
पोलिसांच घटनास्थळी धाव
या चोरीत २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घरातील महागडा आयफोन न चोरता केवळ रोकडच चोरल्याने चोरटा सराईत व तंत्रज्ञानाची जाण असलेला असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ञ व श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



