Theft of Gold Jewelry : राहुरी शहरात बंद असलेल्या घरातील सोन्याचे दागीने व गृहोपयोगी साहित्याची चोरी

Theft of Gold Jewelry : राहुरी शहरात बंद असलेल्या घरातील सोन्याचे दागीने व गृहोपयोगी साहित्याची चोरी

0
Theft of Gold Jewelry : राहुरी शहरात बंद असलेल्या घरातील सोन्याचे दागीने व गृहोपयोगी साहित्याची चोरी
Theft of Gold Jewelry : राहुरी शहरात बंद असलेल्या घरातील सोन्याचे दागीने व गृहोपयोगी साहित्याची चोरी

Theft of Gold Jewelry : राहुरी : राहुरी शहरातील (Rahuri City) शनिचौक परिसरात एका बंद असलेल्या घरातील चार लाख रुपयांचे सोन्याचे दागीने (Theft of Gold Jewelry) व गृहोपयोगी साहित्य चोरुन नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) ४ जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अच्युत रघुनाथ पोपळघट यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अच्युत पोपळघट व त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांसाेबत नेहमी जागेवरुन वाद होत असत. त्यामुळे अच्युत पोपळघट यांनी त्या जागे संदर्भात कोर्टात केस दिलेली आहे.

नक्की वाचा : मोटारसायकल चोरी प्रकरणी सापळा रचून जप्त केली चार आरोपींना अटक

घराचे समोरील गाडी व सी.सी.टी.व्हीची तोडफोड

अच्युत पोपळघट यांनी तनपुरेवाडी रोड येथे नवीन घेतलेल्या जागेमध्ये बांधकाम करावयाचे असल्याने ते नवीन बांधकामा शेजारी शेडमध्ये सहा महिन्यापासुन तात्पुरत्या वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे शनी चौका जवळील राहते घर बंद होते. त्या घरामध्ये घरातील वापराच्या सर्व वस्तु होत्या. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय नवले यांनी अच्युत पोपळघट यांना चौकशी कामी शनी चौकातील त्यांच्या जुन्या घरी बोलाविले. त्यावेळी अच्युत पोपळघट हे जुन्या घरी गेले. त्यांनी घर उघडुन घराची पाहणी केली असता त्यांचे घराचे समोरील कॉलिस गाडी नं. एम.एच. १७ के. ३७९ हिचे काच, बोनेट, व इंजिनचे, डिझेल टाकीचे तसेच सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची तोडफोड करुन नुकसान केलेले दिसले. तसेच घरातील एकुण ४ लाख ३९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व गृहोपयोगी साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

४ जणांवर चोरीचा गुन्हा दाखल (Theft of Gold Jewelry)

अच्युत रघुनाथ पोपळघट यांच्या फिर्यादीवरून आरोपी सदानंद घनश्याम पोपळघट, घनश्याम दत्तात्रय पोपळघट, रेणुका घनश्याम पोपळघट, मेघना घनश्याम पोपळघट, सर्व रा. शनी चौक, राहुरी, अशा ४ जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.