Unseasonal Rain : पाथर्डीत अवकाळी पावसाचा कहर

Unseasonal Rain : पाथर्डीत अवकाळी पावसाचा कहर

0
Unseasonal Rain : पाथर्डीत अवकाळी पावसाचा कहर
Unseasonal Rain : पाथर्डीत अवकाळी पावसाचा कहर

Unseasonal Rain : पाथर्डी : शहर व परिसरात सोमवारी (ता.१९) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) वादळी वाऱ्यांच्या साथीने अक्षरशः धुमाकूळ घातला. विजेच्या कडकडाटासह (Lightning Strike) आलेल्या या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे आणि मोठ्या फांद्या कोसळल्या. विशेषतः महावितरणच्या तारांवर व केबलवर झाडे कोसळल्याने विजपुरवठा ठप्प झाला आहे.

नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ

सौर प्लेटांचे नुकसान

नगरपरिषदेच्या नवीन इमारतीवरील सौर प्लेटा जोरदार वार्‍याने उडून उपजिल्हा रुग्णालयावर आल्या, ज्यामुळे दहा हून अधिक सौर प्लेटांचे नुकसान झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निलगिरीचे झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला, आणि वाहतूक ठप्प झाली. शहरातील विविध भागांमध्ये झाडे कोसळून रस्ते अडले आहेत. काही ठिकाणी फ्लेक्स बोर्ड उन्मळून पडले आहेत. तळमजल्यातील आणि रस्त्याच्या खालील दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. 

अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?

पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने चिखलाचे साम्राज्य (Unseasonal Rain)

शहरात लाखो रुपये खर्चून करण्यात आलेल्या गटारीच्या कामाचा फोलपणा उघड झाला आहे. अनेक ठिकाणी मातीचा भराव खचून गेला असून, पावसाचे पाणी निचऱ्याऐवजी रस्त्यावर साचल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. कसबा येथील शाळेसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तालुक्यातील माळी बाभुळगाव, हत्राळ, चांदगाव, माळेगाव, मढी, निवडुंगे, शिरसाटवाडी, रांजणी, खेर्डे, साकेगाव, डांगेवाडी, कारेगाव या गावांमध्येही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोर होता. काही ठिकाणी पत्र्याची शेड्स उडून गेली, तर रस्ते बंद झाले. अवघ्या एका तासाच्या पावसाने शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान घडवून आणले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केले असले तरी, वीज व दूरसंचार सेवा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे.