Varkari Accident : जेजुरीनंतर अहिल्यानगरच्या रुईछत्तीशीत वारकऱ्यांचा अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत एक जण जखमी

0
Varkari Accident : जेजुरीनंतर अहिल्यानगरच्या रुईछत्तीशीत वारकऱ्यांचा अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत एक जण जखमी
Varkari Accident : जेजुरीनंतर अहिल्यानगरच्या रुईछत्तीशीत वारकऱ्यांचा अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत एक जण जखमी

Varkari Accident : नगर : जेजुरी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेला अपघाताची घटना ताजी असतानाच वारीत आणखी एक अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरमध्ये भरधाव पिकअपने वारकऱ्यांना जोरात धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे.

नक्की वाचा : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना

रस्ता ओलांडताना धडक

जेजुरी येथील वारीतील अपघातामुळे राज्यभरात शोककळा असतानाच अहिल्यानगरमध्ये वारीत अपघात झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात आज (ता. १४) अपघात झाला आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १९ मधील वसंतराव गवते हे नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जिल्हा रुग्णालयात उपचार (Varkari Accident)

या धडकेत गवते यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा काल (ता. १३) रात्री साकत गावामध्ये मुक्कामी होता. आज (ता. १४) सकाळी पुढील प्रवासासाठी निघाल्यानंतर रुईछत्तीसी शिवारात अपघाताची ही थरारक घटना घडली. या अपघातानंतर चालक गाडी सोडून पसार झाला आहे. नगर तालुका पोलिसांनी जखमी वारकऱ्याला रुग्णालयात दाखल करून चालकाचा शोध घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.