
Village Sanitation Campaign : राहाता : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात (Sant Gadge Baba Village Sanitation Campaign) विभागीय पातळीवरील प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत लोणी बुद्रुक (Loni Budruk) (ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांना जाहीर झाला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथील विकास योजना शाखा यांच्यातर्फे सन २०२५-२६ अंतर्गत विभागस्तरावर राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ‘राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे’ निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
नक्की वाचा : राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यास मंजुरी; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
ग्रामपंचायतींची नावे घोषित
जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींच्या तपासणीनंतर नाशिक विभागातील विजेत्या ग्रामपंचायतींची नावे घोषित करण्यात आली आहेत.
श्रीमती शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल ग्रामपंचायतीला विभाग स्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सर्वत्र अभिनंदन (Village Sanitation Campaign)
नाशिक विभागात द्वितीय पुरस्कार, ग्रामपंचायत वाठोडे, ता. शिरपूर, जि. धुळे आणि तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत भोकणी, ता. सिन्नर, जि. नाशिक यांना जाहीर झाले आहेत. अपर आयुक्त (विकास) तथा प्राधिकृत अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक कार्यालयाने हे पुरस्कार जाहीर केले असून पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


