Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Yoga Day : नगर : योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य आरोग्य परंपरा असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णमाला बांगर यांनी केले.

हेही वाचा : निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण, लूट व खंडणी प्रकरणात कारवाई

यांची उपस्थिती

जिल्हा आयुष रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आयुष रुग्णालयात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्शना धोंडे-बारवकर, योगविद्याधामचे संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा, योगविद्याधामचे उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नक्की पहा : पुण्यात नगरसेवकांच्या डोक्यात हेल्मेट अन् खांद्याला काळ्या पट्ट्या…

योग हे भारताचे वैभव (Yoga Day)

डॉ. बांगर म्हणाल्या की, योग हे भारताचे वैभव असून आज संपूर्ण जग आरोग्य संवर्धनासाठी योगशास्त्राचा स्वीकार करीत आहे. वाढत्या हृदयविकार, मधुमेह, सांधे व मणक्यांच्या विकारांपासून बचाव करण्यासाठी नियमित योगाभ्यास, संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. दर्शना धोंडे-बारवकर म्हणाल्या की, नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी आणि संतुलित राहते. व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेत वाढ होऊन मानसिक तणाव कमी होतो. योगविद्याधामचे संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा यांनी नियमित योगाभ्यासाचे विविध आरोग्यदायी लाभ स्पष्ट केले. सांधे, मणके, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवर योग, प्राणायाम आणि ध्यान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.