
Young man beaten with an iron rod : नगर : नगर-पुणे रोडवरील (Nagar-Pune Road) हॉटेलसमोर एका २६ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करत लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Young man beaten with an iron rod) केल्याची घटना १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी सागर राजू मुर्तडकर, सनी मुर्तडकर, आकाश मुर्तडकर, शिवम शिगंटे (सर्व रा. वंजारगल्ली, मंगलगेट, अहिल्यानगर) आणि गणेश सुंभे (रा. भूतकरवाडी, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित सुरेश पाथरकर (वय २६, रा. सिद्धेश पार्क, केडगाव, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या दवाखाना जबाबावरून पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविला. पोलिसांच्या नोंदीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास राजश्री हॉटेलसमोर ही घटना घडली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत (Young man beaten with an iron rod)
पाथरकर यांना संबंधित आरोपींनी शिवीगाळ व धक्काबुक्की करून लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील मॅक केअर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत लोखंडी रॉडचा वापर झाल्याचे पोलीस नोंदीत नमूद असून, मारहाणीच्या वेळी निळ्या रंगाची ‘२००’ क्रमांकाचे वाहन तेथे असल्याची माहितीही नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.


