Rajya Sabha Election : नगर : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची (Candidates) यादी जाहीर केली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते, माया इवनाते यांना भाजपकडून (BJP) राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हे वाचा : पोलीस कर्मचाऱ्याकडून बसच्या वाहक व चालकाला मारहाण
विनोद तावडेंचे पुनर्वसन
केंद्रीय मंत्री आणि आरपीआय (आठवले) गटाचे प्रमुख रामदास आठवले यांना भाजपने आपल्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे या निमित्ताने संसदेत पुनरागमन होत आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांनाही राज्यसभेची संधी देऊन भाजपने सामाजिक समीकरणे साधली आहेत. नागपूरच्या माजी महापौर आणि भाजपच्या आदिवासी महिला नेत्या माया ईवनाते यांना उमेदवारी देऊन पक्षाने आदिवासी समाजाला मोठे प्रतिनिधित्व दिले आहे.
नक्की पहा : शरद पवार राज्यसभेवर जाणार? जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
भाजपचे सोशल इंजिनिअरिंग (Rajya Sabha Election)
महाराष्ट्रातील संख्याबळ पहिले तर भाजपचे ४ उमेदवार नक्की निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मराठा, आदिवासी, ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला चारही उमेदवारांच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. सोबतच, यादीतून प्रादेशिक समतोल देखील राखण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचं दिसून येतंय. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील उमेदवारांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.



