Child Marriage : पारनेरमध्ये बालविवाह जनजागृती अभियान

Child Marriage : पारनेरमध्ये बालविवाह जनजागृती अभियान

0
Child Marriage : पारनेरमध्ये बालविवाह जनजागृती अभियान
Child Marriage : पारनेरमध्ये बालविवाह जनजागृती अभियान

 
Child Marriage : पारनेर : बालविवाह (Child Marriage) ही समाजाला लागलेली एक अनिष्ट प्रथा आहे. ती मुळापासून उखडून टाकण्यासाठी सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती होणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने, स्नेहालय (Snehalaya) संस्था संचलित ‘उडान’ प्रकल्पाच्या (Udaan Project) वतीने पारनेर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील कण्हेर ओहळ अंगणवाडी येथे ‘बालविवाह प्रतिबंधक जनजागृती अभियान’ राबविण्यात आले.आजच्या धावपळीच्या युगातही काही ठिकाणी अज्ञानापोटी किंवा सामाजिक दबावामुळे बालविवाहाच्या घटना घडताना दिसतात. यावर प्रतिबंध घालण्यासाठी स्नेहालयची ‘उडान’ टीम सातत्याने कार्यरत आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडी क्रमांक ५ ला सदिच्छा भेट देऊन अंगणवाडी सेविका, मदतनीस,शिक्षिका,स्थानिक महिला आणि पालकांशी संवाद साधण्यात आला.

नक्की वाचा : भाजपकडून महाराष्ट्रातून चार उमेदवारांना संधी; यांची उमेदवारी जाहीर 

उपस्थितांना मार्गदर्शन

याप्रसंगी उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर आणि पत्रकार भगवान गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम स्पष्ट करताना सांगितले की, “कमी वयात विवाह केल्याने मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यांचे शिक्षण थांबते आणि पर्यायाने एका पिढीचे नुकसान होते. बालविवाह हा केवळ सामाजिक गुन्हा नसून तो कायद्याने दंडनीय अपराध आहे. मुला-मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करू देणे हीच खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे.”

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

तळागाळातील लोकांपर्यंत हा संदेश पोहोचण्यास मदत (Child Marriage)

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका सुनंदा मगर आणि,मुख्याध्यापिका शगुफा शेख , सुवर्णा खेडेकर, सय्यद,यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी आपल्या भागातील किशोरवयीन मुली आणि त्यांच्या पालकांना या अभियानात सहभागी करून घेतले. अंगणवाडी स्तरावर अशा प्रकारचे उपक्रम राबवल्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत हा संदेश पोहोचण्यास मदत होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

स्नेहालय संस्थेच्या या उपक्रमाचे पारनेर शहरात कौतुक

अभियानाचे मुख्य मुद्दे, कमी वयात मातृत्वाने येणारे धोके टाळणे., बालविवाह प्रतिबंधक कायद्याची (२००६) माहिती देणे, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सतर्क राहण्याचे आवाहन. स्नेहालय संस्थेच्या या उपक्रमाचे पारनेर शहरात कौतुक होत आहे अशा जनजागृतीमुळे भविष्यात बालविवाहाच्या प्रथा थांबण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.