Movement : अकोले : तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या राजूर गावासाठी थेट भंडारदरा धरणातून (Bhandardara Dam) पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा (Water Supply) करावा. जेणेकरून गावाला भेडसावणारा पाणीप्रश्न मार्गी लागेल, यासाठी शुक्रवार (ता.6) गाव बंद करून कोल्हार-घोटी (Kolhar-Ghoti) मार्गावर रास्ता रोको आंदोलन (Movement) करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक यांनी दिली.
नक्की वाचा : शेंडी-भंडारदरा येथे चौघांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत
नागरिक त्रस्त
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून राजूर गावाला पाणीप्रश्न भेडसावत आहे. सातत्याने गावाला पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहे. सुरुवातीपासून जीवन प्राधिकरणच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे राजूर पाणीपुरवठा योजनेचा फज्जा उडालेला आहे. सातत्याने अनियमित पाणीपुरवठा, मोटारी जळणे, पाईप फुटणे यामुळे सतत चार -पाच दिवसाने पाणीपुरवठा होणे अशा एक ना अनेक समस्या आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व्हावी (Movement)
यामुळे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी राजूरसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व्हावी व सदर योजना थेट भंडारदरा धरणातून पाईपलाईन टाकून करावी. यासाठी शुक्रवारी गाव बंद व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते किरण माळवे, संतोष मुर्तडक, राजेंद्र वाघ, सुनील सोनार आदींच्या सह्या आहेत.



