Akshay Kardile : संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील – अक्षय कर्डिले

Akshay Kardile : संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील - अक्षय कर्डिले

0
Akshay Kardile : संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील - अक्षय कर्डिले
Akshay Kardile : संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील - अक्षय कर्डिले

Akshay Kardile : राहुरी : जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले (Akshay Kardile) यांच्या हस्ते तसेच धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे (Raju Shete) यांच्या प्रमुख उपस्थितीत तांदुळवाडी येथे ग्रामपंचायत सदस्या स्वाती विनीत धसाळ (Swati Vineet Dhasal) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमास गावातील विविध मान्यवर, युवक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पहा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम

नागरिकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार

उद्घाटन प्रसंगी कार्यालय सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून गावात राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यात आली. हे कार्यालय केवळ अर्ज स्वीकृतीसाठी नसून गावकऱ्यांसाठी हक्काचे, विश्वासाचे आणि आधाराचे ठिकाण ठरणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या विविध योजना, समस्या निवारण, मार्गदर्शन व तक्रार नोंदणी यासाठी नागरिकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे नमूद करण्यात आले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

स्वाती धसाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, (Akshay Kardile)

“हे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांचे आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीला येथे आपलेपणाने मार्गदर्शन व सहकार्य मिळेल. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

राजू शेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल. भविष्यात या माध्यमातून अधिक मजबूत जनसंपर्क निर्माण होऊन निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युवा नेते अक्षय कर्डिले यांनी सातत्यपूर्ण कार्याची प्रशंसा करताना सांगितले की, गावाच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ यामुळे भविष्यातही सकारात्मक बदल घडतील. विकासकामांच्या सातत्यातून तांदुळवाडी प्रगतीपथावर राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात गावातील युवक सार्थक उत्तम बनसोडे यांचा स्केटिंग स्पर्धेतील उल्लेखनीय यशाबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच रोहिणी आंबेकर यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, बाबासाहेब शिंदे, मारुती नालकर, दत्तात्रय म्हसे, अक्षय भुजाडी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, भास्कर काशिनाथ पेरणे, भागवत धसाळ, हभप गीतामाई धसाळ, हभप महेश महाराज खाटेकर, बाळासाहेब धसाळ, रंगनाथ पेरणे, रघुनाथ हंडाळ, तात्यासाहेब धागुडे, कानिफनाथ धसाळ, मोहन खाटेकर, भास्कर चव्हाण, लक्ष्मण पेरणे, अनिल निकम, शिवाजी खडके, मच्छिंद्र चव्हाण, प्रभाकर धसाळ, अशोक तोडमल, गोरक्षनाथ धसाळ, अशोक धागुडे, अशोक पेरणे, आण्णासाहेब खाटेकर, सुखदेव पेरणे, अरुण धसाळ, रेवन्नाथ पेरणे, सुखदेव खाटेकर, रेवन्नाथ खडके, उध्दव धसाळ, अविनाश पेरणे, स्वप्निल पेरणे, संतोष धसाळ, प्रमोद खडके, संजय धागुडे, प्रसाद पेरणे, भाऊसाहेब धागुडे, नाना चव्हाण, किरण धसाळ,

गोरख मोरे, प्रवीण धसाळ, विठ्ठल धागुडे, दत्तात्रय मोरे, शिवाजी धसाळ, धनंजय कदम, अनिल गायकवाड, आबासाहेब पेरणे, रावसाहेब खडके, भाऊसाहेब धसाळ, योगेश पेरणे, भाऊराव खडके, दिलीप खडके, नवनाथ निकम, नवनाथ खडके, बाबासाहेब पेरणे, सिताराम पेरणे, एकनाथ धसाळ, बाबा खडके, आप्पा लोखंडे, नितीन निकम, विष्णू चव्हाण, डॉ. राजेश पेरणे, लक्ष्मण वर्पे, एकनाथ खाटेकर, बबन डुक्रे, विजय तोडमल, अमोल धसाळ, सौरभ पेरणे, स्वप्निल धसाळ, सिध्दार्थ पेरणे, मनोज धसाळ, राहुल धसाळ, विजय धसाळ, अजय धसाळ, ओंकार तोडमल, ओंकार म्हसे, कैलास धागुडे, अमर मोरे, अंकुश वाघ, मनोज धसाळ, संदीप खडके, प्रशांत पेरणे, दिपक धसाळ, सचिन शेटे, मारुती शिंदे, कासिम शेख, गणेश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.