
Good Touch and Bad Touch : गेल्या अनेक वर्षांपासून स्टार प्लसने (Star Plus) भावना प्रधान आणि प्रेक्षकांना भावतील अशा अनेक कथा प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. स्टार प्लसच्या आयकॉनिक मालिकांपैकी एक असलेली मालिका म्हणजे “क्योंकि सास भी कभी बहू थी” (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) ही केवळ कौटुंबिक मालिका नसून या मालिकेने वास्तव जीवनातील प्रश्न आणि महत्त्वाचे सामाजिक विषय देखील सहजरित्या मालिकेतून मांडले आहेत. प्रेक्षकांना समजण्यासारख्या सोप्या पण लक्षवेधी पद्धतीने हे विषय कथेत गुंफल्यामुळे प्रेक्षकांना जवळच्या वाटणाऱ्या पात्रांमधून अनेक महत्त्वाच्या चर्चांना आवाज मिळाला.

नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
अशा गोष्टींबद्दल बोलणे आवश्यक
मालिकेत सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये परीच्या मुली गरिमाच्या अपहरणानंतर तुलसीने तिच्याशी केलेली संवाद अत्यंत संवेदनशीलतेने दाखवला आहे. या आघाताकडे दुर्लक्ष न करता तुलसी हळुवारपणे गरिमाला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ (Good Touch and Bad Touch) यातील फरक समजावून सांगते. त्याच वेळी ती तिला हेही सांगते की अशा गोष्टींबद्दल बोलणे केवळ योग्यच नाही तर आवश्यक आहे. हा प्रसंग संयत असला तरी तो अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. हा प्रसंग कथानकाला धक्क्यापासून जागरूकतेकडे आणि भीतीपासून सशक्तीकरणाकडे नेतो.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
निर्माती एकता कपूर म्हणाली की, (Good Touch and Bad Touch)
“जेव्हा तुलसी पडद्यावर अशा मुद्द्यांवर बोलते तेव्हा घरातील पालकांनाही मुलांशी अशा महत्त्वाच्या विषयांवर संवाद सुरू करण्याची प्रेरणा मिळते. क्योंकि सास भी कभी बहू थी करताना आम्हाला जाणवलं की विराणी कुटुंबावर प्रेक्षकांनी ठेवलेला विश्वास ही आमची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वास्तवाचे प्रतिबिंब दाखवणे महत्त्वाचे झाले. गरिमाच्या ‘गुड टच आणि बॅड टच’ या विषयावर आधारित ट्रॅक आणणे हा केवळ कथानकाचा निर्णय नव्हता तर कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या माध्यमातून दीर्घकाळ चालत आलेले मौन तोडण्याचा प्रयत्न होता. जेव्हा तुलसी देशभरातील घरांमध्ये शारीरिक मर्यादांबद्दल बोलते तेव्हा पालकांनाही आपल्या घरी हा संवाद सुरू करण्याचे धैर्य मिळते”
या संवेदनशील ट्रॅकच्या मागील मोठ्या उद्देशावर भर देताना एकता कपूर सांगते की, “विचारपूर्वक वापरल्यास टेलिव्हिजन हे जागरूकतेचे प्रभावी माध्यम ठरू शकत. टीव्हीद्वारे मुलांना संमती आणि सुरक्षित स्पर्शाबद्दल शिकवणं त्यांना भीती न बाळगता बोलण्याची आणि काहीतरी चुकीचे घडत असल्याचे ओळखण्याची ताकद देते. जर या कथेमुळे एक जरी मोकळा संवाद सुरू झाला आणि एखाद्या मुलाला अधिक सुरक्षित व ऐकले जात असल्याची भावना मिळाली तर या मालिकेने मनोरंजनापलीकडे जाऊन आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे”
या ट्रॅकनंतर टेलिव्हिजनच्या पडद्याबाहेरही अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्थपूर्ण कथाकथन समाजात खऱ्या बदलाला चालना देऊ शकते याची पुन्हा आठवण या मालिकेने करून दिली आहे. संवेदनशीलतेने आणि योग्य हेतूने मांडलेले असे विषय जागरूकता संवाद आणि मुलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.


