
Gram Panchayat : पाथर्डी : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) प्रारूप प्रभागरचनेवर हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत १३ एप्रिलपर्यंत असताना एकूण ५१ हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकती २१ ग्रामपंचायतींकडून पाथर्डी तहसील कार्यालयात (Pathardi Tehsil Office) सादर करण्यात आल्या असून या प्रकरणी पुढील आठवड्यात प्रांताधिकारी स्तरावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून (District Collector) घेतला जाणार आहे.
नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू
प्रतिनिधित्वाबाबतच्या मुद्द्यांवर आक्षेप
तालुक्यातील ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभागरचना सोमवारी (ता. ६) जाहीर करण्यात आली होती. संबंधित ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर या आराखड्याचे प्रदर्शन करण्यात आले होते. आराखडा प्रसिद्ध होताच विविध गावांमधून त्यावर आक्षेप घेत मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात आल्या. प्राप्त हरकतींमध्ये प्रभागांच्या सीमारेषा, लोकसंख्येचे प्रमाण, तसेच प्रतिनिधित्वाबाबतच्या मुद्द्यांवर आक्षेप नोंदवण्यात आल्याचे समजते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचना निश्चित करणार (Gram Panchayat)
दरम्यान, वाळुंज, मालेवाडी, करोडी, चितळी, माळी बाभुळगाव, जाटदेवळे, केळवंडी, आडगाव, जोगेवाडी, मुंगूसवाडे, औरंगपूर, दुले चांदगाव, मिडसांगवी, नांदूर निंबादैत्य, मोहटे, शेकटे, पिंपळगव्हाण, सातवड, मढी, जवखेडे दुमाला, कोपरे या २१ ग्रामपंचायतींकडून एकूण ५२ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. आता प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडून सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचना निश्चित करणार आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये अंतिम निर्णयाकडे लक्ष लागले आहे.


