Women and Child Development : नगर : राज्य व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील महिला आणि बालकांपर्यंत पोहोचविण्यात अहिल्यानगर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली असून, जिल्ह्याच्या विकासाची ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे.
हेही वाचा : अहिल्यानगर शहरात तरुणावर चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी
महत्त्वपूर्ण कामगिरी (Women and Child Development)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना : या योजनेचे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत हजारो लाभार्थ्यांना आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे (सुमारे २३ कोटींहून अधिक) अर्थसहाय्य अदा करण्यात आले आहे.
अनाथ बालकांना भक्कम आधार : कोविड काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी स्पॉन्सरशिप योजनेंतर्गत १४६० मुलांना ५.४७ कोटी रुपयांची अदायगी. जिल्ह्यात ५४६ मुलांना अनाथ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून, १५ अनाथ मुलांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले आहे.
बालविवाह मुक्त भारत अभियानात राज्यात प्रथम : केंद्र शासनाच्या १०० दिवसीय अभियानात अहिल्यानगर जिल्ह्याने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. चाईल्ड हेल्पलाईन (१०९८) च्या प्रभावी वापरातून जिल्ह्यात वर्षभरात ४८ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
ठळक वैशिष्ट्ये (Women and Child Development)
एकाच छताखाली ‘अहिल्या भवन’ची निर्मिती : महिला व बाल विकास विभागाची १३ कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी ‘अहिल्या भवन’ उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या पुढाकाराने या इमारतीसाठी १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच नागरिकांना एकाच छताखाली सर्व सेवा मिळतील.
नक्की पहा : सहर शेखचं पदं धोक्यात येण्याचं कारण काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ३९ हजार पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारीपर्यंतचा लाभ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
सखी वन स्टॉप सेंटर व शक्ती सदन : अडचणीत असलेल्या महिलांच्या मदतीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणि संगमनेर येथे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ व ‘शक्ती सदन’ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत.
पिंक ई – रिक्षातून स्वयंरोजगार : जिल्ह्यातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘पिंक ई-रिक्षा’चे वाटप करण्यात आले असून, महिला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहत आहेत.



