Santosh Deshmukh : नगर : बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत झाल्या असून स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला. सरपंचपदाच्या निवडणुकीत मस्साजोगकडे विशेष लक्ष लागले होते.
हेही वाचा : खासदार निलेश लंकेंचा मोठा गौप्यस्फोट; ‘ती’ केवळ गुगली, २०२९ ला पुन्हा लोकसभेच्याच मैदानात
स्वरूपानंद देशमुख विजयी
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर ही निवडणूक झाली यामध्ये आश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केलेले होते. आज झालेल्या मतदानात गावातील २ हजार ८४ मतदारांपैकी १ हजार ७४४ मतदारांनी आपला हक्क बजावला. आता समोर आलेल्या निकालानुसार संतोष देशमुखांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांना कौल दिला आहे.
नक्की पहा : दुभाजकाला धडकून ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
८४ टक्के मतदान (Santosh Deshmukh)
९२ मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया २८ एप्रिलला पार पडली. या निवडणुकीमध्ये ८४ टक्के मतदान झाले होते.



