Vaibhav Kalubarme : मागासवर्गीय युवांसाठी उद्योजक जागरूकता कार्यक्रम मार्गदर्शक ठरेल : अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे

Vaibhav Kalubarme : मागासवर्गीय युवांसाठी उद्योजक जागरूकता कार्यक्रम मार्गदर्शक ठरेल : अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे

0
Vaibhav Kalubarme : मागासवर्गीय युवांसाठी उद्योजक जागरूकता कार्यक्रम मार्गदर्शक ठरेल : अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे
Vaibhav Kalubarme : मागासवर्गीय युवांसाठी उद्योजक जागरूकता कार्यक्रम मार्गदर्शक ठरेल : अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे

Vaibhav Kalubarme : नगर : ग्रामीण भागातील युवक युवतींमध्ये उज्वल भविष्यासाठी नक्की कसे पाऊले उचलायचे याबाबत मोठा संभ्रम असतो. यासाठी उद्योजक (Entrepreneur) जागरूकता हा कार्यक्रम नवीन उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातल्या त्याचबरोबर मागासवर्गीय समाजातील युवक युवतींसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) वैभव कलुबर्मे (Vaibhav Kalubarme) यांनी केले.

नक्की वाचा: पाथर्डी येथे अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न; आई-वडील, पती व नातेवाईकांवर गुन्हा दाखल

जिल्हाभरातील युवक युवती उपस्थित

अहिल्यानगर मध्ये दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री संस्था (डिक्की ) व नॅशनल एससी –एसटी हब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील मागासवर्गीय युवांसाठी आयोजित उद्योजक जागरूकता आणि विशेष विक्रेता विकास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयचे विभागीय सहाय्यक व्यवस्थापक राहुल मिश्रा, राष्ट्रीय लघु उद्योग निगमचे रितेश रंगारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवदास, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आशिष नवले, सीए असोसिएशनचे विशाल गांधी, पुण्याच्या इंजिनीअरिंग इंडिया कंपनीचे नरेश रामटेके, इंडियन ओईल कॉर्पोरेशनचे अक्षय ओसवाल, कार्यक्रमाचे संयोजक व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेचे समन्वयक चंद्रकात काळोखे आदींसह केंद्र सरकारच्या विविध खात्याचे अधिकारी, तज्ज्ञ वक्ते उपस्थित होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व भागातील सुमारे १५० युवक युवती उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वैभव कलुबर्मे म्हणाले, (Vaibhav Kalubarme)

नौकरी करण्यापेक्षा यशस्वी उद्योजक होऊन नौकरी देणारे बनून स्वतःसह कुटुंबाच्या परिस्थितीत बदल करा. आलेली छोटी संधीही सोडू नका. कारण जी संधी तुम्हाला छोटी दिसते त्या मधूनच वेगवेगळ्या वाटा मिळतात व तुमच्या उद्योगाला, कौशल्याला वेगवेगळे पैलू व दिशा मिळू शकतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, ते कायम घेत राहा हा संदेश त्यांनी आपल्या जीवनातून दिला आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कायम ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा बाळगा. हेच ज्ञान आणि कौशल्य तुमचं भविष्यातलं ब्रेड अँड बटर आहे, याची जाणीव बाळगा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात चंद्रकात काळोखे म्हणाले,

मागासवर्गीय युवांसाठी उद्योजक जागरूकता आणि विशेष विक्रेता विकास हा राज्यातील पहिला मेळावा सर्वप्रथम नगरमध्ये झाला. मागासवर्गीय युवक युवतींना उद्योग क्षेत्राकडे वळवून त्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी नॅशनल एससी –एसटी हब कामकारत असून त्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकारच्या नाव उद्योजकांसाठी बऱ्याच योजन आहेत या योजनांचा लाभ मागासवर्गीयांना मिळावा यासाठी प्रयत्नशील असून नव उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून कार्यक्रमाच्या अयोजाना मागाची भूमिका मांडली.


उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी डिक्की मुख्यालयाचे प्रदीप बागुल यांनी केले. आभार उद्योजक सचिन भारस्कर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here