Car Speed On Missing Link: नगर: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग 1 मे 2026 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी अधिकृत अधिसूचना निर्गमित केली आहे. ज्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे विशेष नियम लागू करण्यात आले आहेत.
वाहतुकीचे दोन टप्पे: मालवाहू वाहनांना प्रतीक्षा (Missing Link)
बोगद्यामधील तांत्रिक बाबी आणि सुरक्षिततेचा विचार करून वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात 1 मे ते 31 ऑक्टोबर 2026 या पहिल्या सहा महिन्यांत केवळ हलकी मोटार वाहने (LMV) आणि प्रवासी बसेस यांनाच या नवीन मार्गावरून प्रवास करता येणार आहे. या काळात अवजड मालवाहू वाहनांना प्रवेश मिळणार नाही. तर, 1 नोव्हेंबर 2026 पासून पहिल्या सहा महिन्यांच्या निरीक्षणांनंतर मालवाहू वाहनांना परवानगी देण्याबाबत फेरआढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
अवश्य वाचा- पाईपलाईन रोड परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
किती असेल वेगमर्यादा? (Missing Link)
मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये वेग नियंत्रणासाठी स्पष्ट मर्यादा आखून देण्यात आल्या असून, कार आणि हलकी वाहनांना ताशी 100 किमी, प्रवासी बस ताशी 80 किमी वेगाने धावू शकणार आहेत. अधिसूचित वेगमर्यादेपेक्षा 5 टक्क्यांपर्यंत वेग अधिक असल्यास कलम 183 अन्वये कारवाई केली जाणार नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
Geographic Reference
धोकादायक वस्तूंना कायमस्वरूपी बंदी (Missing Link)
ज्वलनशील पदार्थ, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना ‘मिसिंग लिंक’च्या बोगद्यात कधीही प्रवेश मिळणार नाही. अशा वाहनांना जुन्या/अस्तित्वातील एक्सप्रेसवे मार्गाचाच वापर करावा लागेल. प्रवाशांसाठी महत्त्वाचेसदर अधिसूचना 1 मे पासून लागू होणार असून, जोपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) पुढील आदेश देत नाही, तोपर्यंत हे नियम कायम राहतील. सदर अधिसूचना अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातून 27 एप्रिल 2026 रोजी तयार करण्यात आली असून 1 मे 2026 पासून अंमलात येणार आहे.



