Mahavitaran Load Shedding : श्रीगोंद्यात महावितरणच्या मनमानी कारभाराचा ‘शॉक’; सत्ताधारी भाजप नगरसेवक आक्रमक!

Mahavitaran Load Shedding : श्रीगोंद्यात महावितरणच्या मनमानी कारभाराचा 'शॉक'; सत्ताधारी भाजप नगरसेवक आक्रमक!

0
Mahavitaran Load Shedding : श्रीगोंद्यात महावितरणच्या मनमानी कारभाराचा 'शॉक'; सत्ताधारी भाजप नगरसेवक आक्रमक!
Mahavitaran Load Shedding : श्रीगोंद्यात महावितरणच्या मनमानी कारभाराचा 'शॉक'; सत्ताधारी भाजप नगरसेवक आक्रमक!

लोडशेडिंगविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा

Mahavitaran Load Shedding : श्रीगोंदा : राज्यात आणि केंद्रात महायुतीची (Mahayuti) सत्ता असतानाही श्रीगोंद्यात महावितरणच्या (Mahavitaran Load Shedding) अधिकार्‍यांनी आपली ‘सत्ता’ चालवल्याने आता सत्ताधारी भाजप नगरसेवकांनाच (BJP Corporator) रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सायंकाळी ६ ते १० या मोक्याच्या वेळी केल्या जाणाऱ्या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असून, या अन्यायाविरोधात भाजप नगरसेवकांनी महावितरणला निवेदनाद्वारे थेट ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नक्की वाचा: पाथर्डी येथे अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न; आई-वडील, पती व नातेवाईकांवर गुन्हा दाखल

वाड्या-वस्त्यांवर ‘शहरी दराने’ वीज बिल वसूल

श्रीगोंदा शहरालगतच्या वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांकडून महावितरण ‘शहरी दराने’ वीज बिल वसूल करते. खिसा रिकामा करूनही प्रत्यक्षात मात्र या भागाला अंधारात लोटले जात आहे. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीज गायब होत असल्याने गृहिणी, विद्यार्थी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. “पैसे पूर्ण घेता, मग वीज का कापता?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अभ्यासाच्या वेळीच वीज गुल (Mahavitaran Load Shedding)

यावेळी आक्रमक भूमिका घेताना नगरसेविका सौ. मनीषा आनंदकर , सौ. कोमल बोरुडे, आणि शहाजी खेतमाळीस यांनी प्रशासनाला धारेवर धरले. “अभ्यासाच्या वेळीच वीज गुल करून प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण थांबवायचे आहे का?” असा जळजळीत प्रश्न त्यांनी निवेदनातून उपस्थित करत केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर येऊन परिस्थिती पाहावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असतानाही स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांची ‘मनमानी’ सुरू असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. “आम्ही निवेदने देऊन थकलो आहोत, आता सहन करणार नाही. जर हे अन्यायी भारनियमन तात्काळ थांबले नाही, तर महावितरणच्या कार्यालयासमोरच ठिय्या मांडू,” असा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.

सत्ताधारी पक्षाचेच लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने आता प्रशासन नमतं घेणार की आंदोलनाचा भडका उडणार, याकडे संपूर्ण श्रीगोंद्याचे लक्ष लागले आहे.