Local Crime Branch : वांगी येथे अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; चार लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी छापा टाकताच एक जण घटनास्थळावरून पसार

0
Local Crime Branch : वांगी येथे अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; चार लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : वांगी येथे अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; चार लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : नगर : श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथे अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई करत एकाला अटक (Arrested) करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे. या कारवाईत सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोविंद काळु पवार (वय २१, रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे (The Accused) नाव आहे.

नक्की वाचा : जलयात्रेमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ : मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

पथकाची तत्काळ घटनास्थळी धाव

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार आणि विशाल तनपुरे यांचा समावेश होता. ३० एप्रिल २०२६ रोजी पथक श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वांगी गावाजवळील बिरोबा मंदिर परिसरात, प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे दोन जण टेम्पोमध्ये वाळू भरताना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकताच एक जण घटनास्थळावरून पळून गेला, तर दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुन्हा दाखल (Local Crime Branch)

गोविंद काळु पवार (वय २१, रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. चौकशीत संबंधित टेम्पो हा सनी लक्ष्मण बारसे (रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याचा असल्याचे समोर आले असून तो सध्या पसार आहे.पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे ४ लाख रुपयांचा विनानंबरचा टेम्पो तसेच २० हजार रुपये किमतीची सुमारे २ ब्रास वाळू असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस रजीमराजा रफीक आत्तार (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.