Radhakrushn Vikhe : ‘डिफेन्स क्लस्टर’च्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा वेगवान विकास : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrushn Vikhe : 'डिफेन्स क्लस्टर'च्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा वेगवान विकास : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrushn Vikhe : 'डिफेन्स क्लस्टर'च्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा वेगवान विकास : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrushn Vikhe : नगर : अहिल्यानगर जिल्हा आता ‘डिफेन्स क्लस्टर’च्या माध्यमातून वेगाने विकसित होत असून, जिल्ह्यात नौदलाच्या संदर्भातील ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’ प्रकल्प उभा राहत आहे. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, यामुळे जिल्ह्यातील युवकांना स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळेल,” असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा :  शेतकरी व कष्टकरी मुलाची गरुडझेप; सचिन वाघचौरे यांची PSI पदी निवड  

यांची उपस्थिती

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त अहिल्यानगर येथील पोलीस कवायत मैदानावर डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.

नक्की पहा : कर्जतमध्ये शेतकरी संतप्त; महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

विखे पाटील म्हणाले (Radhakrushn Vikhe)

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, १ मे १९६० रोजी आपल्या राज्याच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांच्या प्रति राज्य शासन कृतज्ञ आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन राज्याची प्रगतीची घोडदौड सुरू आहे. आज कामगार दिन असून सर्व कष्टकरी बांधवांच्या योगदानाचाही त्यांनी गौरव केला. शेवटी, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्य ध्वजारोहणाच्या या सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.