
Chief Minister Prosperous Panchayat Raj Campaign : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत (Chief Minister Prosperous Panchayat Raj Campaign) सहभाग घेतला आहे. त्यापैकी आदर्श गाव (Model Village) मांजरसुंबा (Manjarsumba) गावाची बीड येथील पथकाने नुकतीच पाहणी केली. गावातील विविध विकासकामांची माहिती घेत पथकाने ग्रामपंचायतीच्या उपक्रमांचे कौतुक केले.

नक्की वाचा: हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी बीड येथील गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, विस्तार अधिकारी अरुण मोरे, सुसेन चांगण, आकाश बनसोडे, पंच अहिल्यानगर पंचायत समितीचे साहेब गटविकास अधिकारी आकूलकर, कृषी अधिकारी दुगम, विस्तार अधिकारी रामदास दळवी, ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाळुंज, सचिन पवार, सचिन शिंदे, राहुल गांगर्डे, संजय नांगरे, कृषी सहाय्यक सुविधा वाणी, तलाठी अनिता जाधव, सरपंच रूपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, विलास भुतकर, बाळासाहेब कदम, छाया कदम, यशवंत भुतकर, के. पी कुसळकर, आरोग्य अधिकारी अशोक इंगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ग्रामस्थांच्या पुढाकाराची पथकाने घेतली दखल (Chief Minister Prosperous Panchayat Raj Campaign)
यावेळी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा व्यवस्था, हरित उपक्रम, महिला बचतगटांचे कार्य तसेच गावातील मूलभूत सुविधांची सविस्तर माहिती पथकाला देण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराची दखल पथकाने घेतली.

पाहणीदरम्यान गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, शाळा परिसर, अंगणवाडी तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या सूचना व अपेक्षाही जाणून घेण्यात आल्या.
गावाच्या विकासासाठी लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामांमुळे मांजरसुंबा हे गाव इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत पथकातील सदस्यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


