Pathardi : पाथर्डीत सर्व महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारावेत; रमेश गोरे यांची मागणी

Pathardi : पाथर्डीत सर्व महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारावेत; रमेश गोरे यांची मागणी

0
Pathardi : पाथर्डीत सर्व महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारावेत; रमेश गोरे यांची मागणी
Pathardi : पाथर्डीत सर्व महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारावेत; रमेश गोरे यांची मागणी

Pathardi : पाथर्डी : पाथर्डी (Pathardi) नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासोबत विविध महापुरुष व महात्म्यांचे पुतळे उभारण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक रमेश गोरे (Ramesh Gore) यांनी आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हे वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

या निवेदनात म्हटले आहे की,

महात्मा गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, भगवान महावीर, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी अहिल्याबाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारल्यास त्यांच्या संरक्षणासह परवानग्यांची प्रक्रिया सुलभ होईल. तसेच जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करण्यास सोयीचे ठरेल, असे गोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भविष्यातील अनावश्यक खर्च टाळता येईल

याशिवाय पुतळ्यांची देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता यासाठीही एकत्रित व्यवस्था करणे सुलभ होणार असून भविष्यातील अनावश्यक खर्च टाळता येईल. शहरातील नागरिकांना विविध महापुरुषांचे विचार एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळणार असल्याने हे ठिकाण शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद ठरेल. स्व. राजीव राजळे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने या मागणीचा गांभीर्याने विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती रमेश गोरे यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, नगरपरिषद पाथर्डी यांनाही देण्यात आली आहे.