Water Supply : शेतीसाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडा; आमदार रोहित पवारांची मागणी

0
Water Supply : शेतीसाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडा; आमदार रोहित पवारांची मागणी
Water Supply : शेतीसाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडा; आमदार रोहित पवारांची मागणी

Water Supply : नगर : कर्जत तालुक्यासह परिसरात सध्या तीव्र उन्हाळ्याची झळ बसत असून, शेतीपिके आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी आणि सीना कालव्यातून उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्यात यावे, तसेच टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांना न्याय्य पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी रोहित पवार यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

हेही वाचा : पुढील सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पालकमंत्र्यांकडे मागणी

याबाबत रोहित पवार यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पत्र देऊन उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी केली असून, महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आवर्तन सोडण्याबाबत बैठक घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला.

नक्की पहा : रांगोळीतून साकारली छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Water Supply)

सध्या उन्हाळी एक आवर्तन पूर्ण झाले असले, तरी वाढत्या तापमानामुळे दुसरे आवर्तन तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी सांगितले. अपुऱ्या पाण्यामुळे शेतीपिके धोक्यात आले असून, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेकदा शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे या वेळी नियोजनबद्ध पाणी वितरण करण्याची मागणी पवार यांनी केली. प्रशासनाकडून लवकरच आवर्तन सुरू केले जाईल, अशी आशा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.