Dharmveer Chhatrapati Sambhaji Maharaj : नगर : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Dharmveer Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उदात्त भावनेतून अहिल्यानगर शहरातील ‘प्रोफेसर कॉलनी’ (Professor Colony) परिसराचे नामकरण धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असे करण्यात यावे, अशी मागणी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील विशेष निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आले.
नक्की वाचा: दगडफेक करत वाहनाची तोडफोड; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या चौकाला त्यांचे नाव देणे काळाची गरज असल्याचे मत
प्रोफेसर कॉलनी परिसरात उभारण्यात आलेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा हा केवळ स्मारक नसून, तो स्वाभिमान, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रेरणास्थान असल्याची भावना फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य, धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान समाजाच्या स्मरणात कायम राहावे, यासाठी या चौकाला त्यांचे नाव देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की,(Dharmveer Chhatrapati Sambhaji Maharaj)
ज्या ठिकाणी धर्मवीरांचा भव्य पुतळा दिमाखात उभा आहे, त्या परिसराला त्यांच्या नावाची ओळख मिळणे हा त्यांच्या इतिहासाचा आणि शौर्याचा खरा सन्मान ठरेल. या मागणीला स्थानिक नागरिक, शिव-शंभू भक्त आणि तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असून, परिसरात व्यापक जनजागृती आणि स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाने लोकभावना लक्षात घेऊन कोणतीही दिरंगाई न करता नामकरणास मंजुरी द्यावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला.
यासंदर्भातील निवेदन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योतीताई गाडे तसेच उपमहापौर धनंजय जाधव यांना देण्यात आले. यावेळी ट्रस्ट कमिटी सदस्य संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, जिल्हाध्यक्ष अशोक गाडे, निलेश सुंबे, दरेकर काका, शशिकांत भांबरे, संजयजी शिंदे, भाग्येश सव्वाशे, सिद्धांत पानसरे, बालाजी काळे, भरत सुंबे, अभय शेडगे, श्रीपाद दगडे, सौरव गांगर्डे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गाडे म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, त्याग आणि शौर्य हे संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने या चौकाची ओळख निर्माण होणे म्हणजे इतिहासाला अभिमानाने वंदन करण्यासारखे आहे. ही केवळ नामांतराची मागणी नसून, जनतेच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा आवाज आहे.



