Leopard : कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard : कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
Leopard : कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard : कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याला पकडण्यासाठी आणखी पिंजरे लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Leopard : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव (Kasar Pimpalgaon) परिसरात मंगळवारी (दि.२०) रात्री नऊच्या सुमारास बिबट्याचे (Leopard) दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वाढता वावर पाहता नागरिकांनी वनविभागाकडे (Forest Department) तातडीने आणखी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. कासार पिंपळगाव परिसरात साखर कारखाना, लहान-मोठे उद्योग, महाविद्यालये, शाळा तसेच दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नक्की वाचा : सिद्धटेक येथील भीमानदी पुलावरील वाहतूक १० दिवसांसाठी बंद

पुन्हा बिबट्या आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली

गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बुधवारी वृद्धेश्वर कारखाना ते कासार पिंपळगाव रस्त्यावर मयूर मुनोत यांच्या दुकानाजवळील पुलाच्या परिसरात पुन्हा बिबट्या आढळून आल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, लहान मुलांना अंधारात एकटे सोडू नये, तसेच शेतकरी बांधवांनी शेतात जाताना समूहाने जावे व टॉर्चचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दुचाकी अथवा पायी प्रवास करतानाही खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

Leopard : कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard : कासार पिंपळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आढावा (Leopard)

कोणालाही बिबट्या दिसल्यास घाबरून न जाता तात्काळ गावातील जबाबदार व्यक्ती अथवा वनविभागाला माहिती द्यावी. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा बिबट्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सरपंच मोनाली राजळे, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के आणि आप्पा राजळे यांनी पुढाकार घेत तिसगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत कार्यालयात परिस्थितीचा आढावा घेतला.

सध्या गावात बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे आणखी एका पिंजऱ्याची मागणी करण्यात आली आहे.वनपाल अशोक शर्माळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा वावर प्रामुख्याने ऊस शेती, पाण्याजवळील भाग आणि झाडी असलेल्या परिसरात अधिक दिसून येतो. तिसगाव वनविभागाचे पथक सध्या कासार पिंपळगाव परिसरात गस्त घालत असून नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव, चितळी, पाडळी या पाटपाण्याच्या परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आले आहेत.