Chief Minister’s Prosperous Panchayat Raj Campaign : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ‘सारोळा सोमवंशी’ प्रथम, तर ‘कोळगाव’ द्वितीय

कडक निकषांच्या आधारे ग्रामपंचायतींचे काटेकोर मूल्यांकन

0
Chief Minister's Prosperous Panchayat Raj Campaign : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ‘सारोळा सोमवंशी’ प्रथम, तर ‘कोळगाव’ द्वितीय
Chief Minister's Prosperous Panchayat Raj Campaign : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ‘सारोळा सोमवंशी’ प्रथम, तर ‘कोळगाव’ द्वितीय

Chief Minister’s Prosperous Panchayat Raj Campaign : श्रीगोंदा : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या (Rural Development Department) वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ (Chief Minister’s Prosperous Panchayat Raj Campaign) अंतर्गत श्रीगोंदा तालुकास्तरीय गुणांकन आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचे (Gram Panchayat) निकाल जाहीर झाले आहेत. ‘लोकसहभागातून होणार ग्रामीण समृद्धी’ हे प्रमुख सूत्र डोळ्यांसमोर ठेवून राबवलेल्या या अभियानात श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी ग्रामपंचायतीने प्रशासकीय पारदर्शकता आणि विकासकामांच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत कोळगाव ग्रामपंचायतीने द्वितीय आणि मुंगुसगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

नक्की वाचा : आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’

कडक निकषांच्या आधारे ग्रामपंचायतींचे काटेकोर मूल्यांकन

शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत या अभियानांतर्गत विविध कडक निकषांच्या आधारे ग्रामपंचायतींचे काटेकोर मूल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत वैयक्तिक आणि सार्वजनिक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

उत्कृष्ट कामगिरीची नोंद (Chief Minister’s Prosperous Panchayat Raj Campaign)

आर्थिक शिस्त व पारदर्शकता, ग्रामपंचायत दप्तर अद्ययावत असणे, करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट आणि डिजिटल कारभार. स्वच्छ भारत अभियान, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर आणि दर्जेदार रस्ते निर्मिती. गावाच्या निर्णय प्रक्रियेत आणि ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांचा, विशेषतः महिलांचा सक्रिय सहभाग. या सर्वच आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत सारोळा सोमवंशी, कोळगाव आणि मुंगुसगाव या ग्रामपंचायतींनी तालुक्यात अव्वल स्थान मिळवले.