Kajwa Festival: दररोज दोन हजार पर्यटकांनाच काजवा महोत्सवासाठी प्रवेश

पर्यटकांना रात्री नऊ नंतर प्रवेश नाही

0


Kajwa Festival:अकोले: भंडारदरा, हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात काजवा महोत्सवादरम्यान (Kajwa Festival) होणारा उपद्रव टाळण्यासाठी पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता दररोज दोन हजार पर्यटकांनाच काजवे बघण्यासाठी प्रवेश मिळणार आहे. वन विभाग यासाठी नवीन मोबाइल ऍप्लिकेशन तयार करत असून, यावर पर्यटकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, या दोन्ही अभयारण्य क्षेत्रात शनिवारी व रविवारी सायंकाळी काजव्यांची जादुई दुनिया पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.

अवश्य वाचा- जवखेडे कासारवाडी नदीपात्रातील अनधिकृत प्रार्थनास्थळ हटवले

पर्यटकांना रात्री नऊ नंतर प्रवेश नाही (Kajwa Festival)

मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जून अर्धा (मोठ्या पावसाच्या सरी कोसळेपर्यंत) या अभयारण्यात काजवा महोत्सव सुरू असतो. निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची पावले या भागात वळत असतात. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन्यजीव विभाग नाशिक सहायक व वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काजवे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वन विभागाने नियमावली घालून दिली आहे. यात अभयारण्यात प्रवेश करतेवेळी पर्यटकांनी तपासणी नाक्यावर आपले ओळखपत्र देणे बंधनकारक आहे. पर्यटकांना अभयारण्यात रात्री नऊ नंतर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पर्यटन शुल्क पावती घेणे बंधनकारक राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here