नगर : एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या पत्रकार अंजना ओम कश्यप (Anjana kashyap) यांनी यूट्यूबवर शिकवणाऱ्या काही शिक्षकांबाबत वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement regarding teachers) केलं आणि सोशल मीडियावर मोठा वाद (Controversy on Social Media) निर्माण सुरु झाला. त्यांच्या वक्तव्यावर अनेक ऑनलाइन शिक्षक, विद्यार्थी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नक्की वाचा : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मिळणार एमआयडीसीमध्ये नोकरी
आता घडलं काय? (Anjana kashyap)
एका टीव्ही चर्चेदरम्यान अंजना ओम कश्यप यांनी काही यूट्यूब शिक्षकांवर टीका करताना त्यांना “दो कौडी के” तसेच “फ्रॉड” म्हटलं असा दावा विविध माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असा आरोप केला आहे की, काही ऑनलाइन शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यापेक्षा प्रसिद्धी, व्ह्यूज आणि आर्थिक फायद्यावर अधिक भर देत देतात. या वक्तव्यानंतर अनेक यूट्यूब शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. विशेषतः कोविड-१९ महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षणामुळे लाखो विद्यार्थ्यांना मदत झाली होती. दुर्गम भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात यूट्यूब शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे अनेकांनी नमूद केले.
अवश्य वाचा : आता रस्त्यांचा कायापालट होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय
सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत. काहींनी अंजना ओम कश्यप यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर काहींनी ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात काही गैरप्रकार होत असल्याने अशा चर्चेची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मात्र या चर्चेत ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा अंजना कश्यप यांच्या या वक्तव्याचा प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर खान सरांनी निषेध केला. त्यांनी म्हटलं आहे की, भारतातील प्रत्येक शिक्षक, मग तो १० मुलांना शिकवत असो वा १० लाखांना, तो अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत घेतो. त्यामुळे शिक्षकांचा असा अपमान करणे चुकीचे आहे. त्यांनी कश्यप यांचे नाव न घेता त्यांना ‘पेड जर्नालिस्ट’ म्हणत “कमीत-कमी आम्ही २ हजार रुपयांच्या नोटेमध्ये चिप शोधत नाही, असा उपरोधिक टोला लगावलाय. तसेच कोणताही खरा शिक्षक सत्तेचे अथवा कोणाचेही ‘तळवे चाटत नाही’, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
खान सरांच्या कोचिंग सेंटरवर अंधाधुंद गोळीबार (Anjana kashyap)
आता याच खान सरांच्या बिहारमधील कोचिंग सेंटरवर मंगळवारी अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाईकवरून आलेल्या गुंडांनी कोचिंग इन्स्टिट्यूटवर ६ राऊंड फायर केले. या हल्ल्यात गोळ्या लागल्यामुळे सेंटरचे मुख्य गेट आणि फलक, बोर्ड फुटला आहे. त्यामुळे खान सरांनी कोचिंग इन्स्टिट्यूट काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र खान सरांच्या या इन्स्टिट्यूटवर हा हल्ला नेमका का झाला, आणि या हल्ला प्रकरणात अजून काय काय खुलासे होणारे हे पाहावे लागणार आहे.



