Rain : पारनेर : गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाडा आणि कडक उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या पारनेरकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. आज दुपारी पारनेर शहर (Parner City) आणि परिसरात वरुणराजाने (Rain) जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात मोठा गारवा (Cool Atmosphere) निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नक्की वाचा : स्वतःच्याच वाहनाच्या चोरीचा बनाव; विमा रक्कम लाटण्याचा बेत फसला
या पावसाचा पारनेर तालुक्यातील शेतीला मोठा फायदा
दुपारनंतर अचानक आकाशात ढगांची दाटी झाली आणि काही वेळातच पावसाने जोर धरला. शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्थानक परिसरात पावसाचा जोरदार वर्षाव झाला. बसस्थानक चौक, आनंद नगर, राहुलनगर या सखल भागात पाणी साचले होते, तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे शहरवासीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या पावसाचा सर्वात मोठा फायदा पारनेर तालुक्यातील शेतीला होणार आहे. मृग नक्षत्राच्या तोंडावर झालेल्या या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पारनेरच्या तापमानात लक्षणीय घट (Rain)
मान्सूनचे आगमन वेळेवर होत असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीपूर्व कामांना आता वेग दिला आहे. काही ठिकाणी शेतजमिनीची मशागत पूर्ण झाली असून, आता खत आणि बियाणे खरेदीसाठी शेतकरी लगबग करताना दिसत आहेत. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत या पावसामुळे भर पडण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. पावसामुळे पारनेरच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून, वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला आहे. मात्र, पावसाच्या या पहिल्याच सरींमध्ये आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
मान्सूनच्या प्रतीक्षेचा अंत
पहिल्या पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका संभवतो, त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि स्वच्छतेचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.एकूणच, आजच्या दमदार पावसाने पारनेरकरांच्या मान्सूनच्या प्रतीक्षेचा अंत केला असून, पावसाळ्याच्या आगमनाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



