Kopargaon : चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत; कोपरगाव पोलिसांची कामगिरी

0
Kopargaon : चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत; कोपरगाव पोलिसांची कामगिरी
Kopargaon : चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत; कोपरगाव पोलिसांची कामगिरी

Kopargaon : कोपरगाव : कोपरगाव शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणांहून हरविलेले तसेच चोरीस गेलेले चार महागडे मोबाईल फोन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने शोधून काढत मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. या कारवाईमुळे मोबाईलधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कोपरगाव तालुका पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

तांत्रिक तपासाच्या आधारे शोध

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी अंजना भांगरे-झडे यांनी तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेतला. तांत्रिक तपासाच्या आधारे हे चारही मोबाईल शोधण्यात यश आले.

नक्की पहा : दत्तात्रय पानसरे यांनी माघार घेऊन काय मिळविले?

पोलिसांचे आभार (Kopargaon)

शोधून काढण्यात आलेले मोबाईल आज पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते संबंधित मूळ मालकांना परत देण्यात आले. अनेकदा मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर तो परत मिळण्याची आशा नागरिक सोडून देतात. मात्र कोपरगाव तालुका पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून हे मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन केल्याने संबंधित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे तसेच या मोहिमेत सहभाग घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.