Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाने तारीख सांगितली

0
Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाने तारीख सांगितली
Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाने तारीख सांगितली

नगर : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून (Monsoon Update) गोव्यानंतर महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये धडकला आहे. मात्र अजूनही राज्याच्या कानाकोपऱ्यात नैऋत्य मोसमी वारे पोहोचले नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झालेत. मान्सूनच्या आगमनाकडे नागरिकांचे लक्ष लागले. येत्या दोन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. अल निनो सारख्या महाभयंकर संकटामुळे मान्सूनची प्रगती मंदावली असल्याचं हवामान विभागाने (Meteorological Department) स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा : भारतीय नागरिक Reels वर नेमकं काय पाहतात? मेटाने केला मोठा खुलासा

अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट (Monsoon Update)

राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्वमोसमी पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत २ दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन (Monsoon Update)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. मुंबईत २ दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनचा प्रवास यंदा काहीसा संथ गतीने होत असला तरी तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकतोय. प्रत्येक वर्षी मान्सूनच्या प्रवासाचा वेग कमी-अधिक प्रमाणात बदलत असतो. समुद्रातील वातावरणातील बदल, मान्सून वाऱ्यांची तीव्रता तसेच उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव यामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत असतो.

अवश्य वाचा : १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीसाठी बीसीसीआयने बदलला ‘तो’ महत्वाचा नियम

सध्या राज्यातील काही भागांत होत असलेला वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट हा पूर्वमोसमी वातावरणाचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करण्याचे टाळावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, खरीप हंगामातील पेरणीसाठी पुरेसा आणि सतत पडणारा पाऊस आवश्यक आहे. आगामी काही दिवसांत मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होण्याची शक्यता असून राज्यातील बहुतांश भागांत पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.